कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची चर्चा आहे. छोट्या पडद्यावरही लग्नाचीच धूम पाहायला मिळत आहे. स्टार भारत वाहिनीवरील ‘निमकी मुखिया’ या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री भूमिका गुरुंग हिचा नुकताच साखरपुडा झाला. प्रियकर अमित सिंग गोसेन ऊर्फ कीथ याच्याशी तिचा साखरपुडा पार पडला आणि याची कोणालाच तिने कानोकान खबर लागू दिली नाही.

भूमिका आणि अमित गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. अमित नृत्यदिग्दर्शक आहे. ‘कीथ आणि मी पाच वर्षांपासून एकत्र राहत आहोत. त्यामुळे लपूनछपून लग्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या दोघांच्याही घरी याची कल्पना आहे आणि आमचे पालक एकमेकांना अनेकदा भेटले आहेत. माझा रोका झाला असून लग्नाची आम्हा दोघांनाही घाई नाही,’ असं भूमिका म्हणाली.

भूमिका आणि अमित यांचं काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाल्याचीही चर्चा होती. पण ‘आमच्यातील तो फक्त एक वाद होता, इतकंच’ असं म्हणत अमितसोबत पॅचअप केल्याचं तिने नंतर स्पष्ट केलं. भूमिका आणि अमित यांची ओळख एका मित्राकडून झाली. लग्नानंतरही मी अभिनय क्षेत्रात काम करतच राहीन असं भूमिकाने स्पष्ट केलं.

Story img Loader