विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आज इंडस्ट्रीमध्ये त्यांना ‘अशोक मामा’ म्हणूनच ओळखलं जातं. पण त्यांच्या नावामागची कहाणी तुम्हाला माहीत आहे का? त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी त्यांच्या नावामागची खरी कहाणी सांगितली आहे. त्याचसोबत एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे.

अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत अशोक सराफ यांचा हा फोटो आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिलं, ‘गुरू-शिष्य…मोठी बहीण विजया अशोक कुमारांची खूप मोठी चाहती..त्यांच्या अभिनयानं ती खूप भारावून गेली होती. धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा तिने हट्टानं त्याचं नाव अशोककुमार ठेवायला आईला भाग पाडलं. ईश्वरानेही तथास्तु म्हटलं. अशोककुमार सराफचाच पुढे झाला अशोक सराफ. चतुरस्त्र अभिनेता आज ७२व्या वर्षीही तितक्याच ताकदीने उत्साहाने ठामपणे उभा आहे आणि अशोककुमारांना गुरू स्थानी मानतो आहे.’

jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
Ajit Pawar Told This Thing About Sharad Pawar
शरद पवारही कुटुंबाच्या विरोधात गेले होते? अजित पवारांनी सांगितलेला किस्सा आहे तरी काय?
annual session of china s top political advisory body
सगळे आलबेल असल्याची बतावणी?
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य

https://www.instagram.com/p/B_y3ekppczU/

‘विनोदाचा सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. वयाच्या ७२ व्या वर्षीसुद्धा ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘प्रवास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत काम केलं होतं. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर अशोक मामांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला.