सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री डेझी शाहने शेवटच्या ‘हेट स्टोरी ३’ चित्रपटात बोल्ड भूमिका साकारली होती. तिला पहिल्यांदाच अशा भूमिकेत पाहिल्यानंतर तिचे चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. मात्र डेझीला आता तिची ही इमेज बदलायची आहे. पुन्हा बोल्ड सीन्स करणार नसल्याचं डेझीने स्पष्ट केलं आहे.
‘हेट स्टोरी ३’मध्ये तिने बरेच इंटिमेट सीन्स केले. पण भविष्यात तिला अशा प्रकारची भूमिका साकारायची इच्छा नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं की, ‘आता मी पुन्हा कधीच बोल्ड आणि इंडिमेट सीन्स करणार नाही. मी फक्त सामान्य मुलीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारु शकते असं अनेकांना वाटत होतं. मला हटके भूमिका साकारण्याची इच्छा होती म्हणून ‘हेट स्टोरी ३’मध्ये काम केलं.’
https://www.instagram.com/p/BYifUc0jec6/
वाचा : आम्हाला न्याय द्या; जिया खानच्या आईचे मोदींना पत्र
मला स्वत:ची ओळख एक बोल्ड अभिनेत्री म्हणून निर्माण करायची नाही. ज्या भूमिकांमधून मला अभिनय कौशल्य दाखवता येईल अशा भूमिका साकारण्याची माझी इच्छा आहे, असंही ती म्हणते. दरम्यान डेझीकडे सध्या कोणताही चित्रपट नसून सलमान खानसोबत ती युकेच्या टूरवर आहे. ‘दबंग’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या टूरचं आयोजन करण्यात आलं आहे. सोनाक्षी सिन्हा, जॅकलिन फर्नांडिस, मनिष पॉल, सूरज पांचोली, प्रभू देवा आणि कमाल खानसुद्धा या टूरमध्ये सहभागी आहेत.
https://www.instagram.com/p/BYFY6CMDnT_/
‘रेस ३’ या चित्रपटात डेझी झळकरणार असल्याचीही गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा होती. मात्र अद्याप चित्रपटाचा करार झाला नसून निर्मात्यांशी फक्त चर्चा झाली असल्याचं तिने स्पष्ट केलं.