चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना फार कमी वय असतं असं म्हटलं जातं. अभिनेत्रींच लग्न झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा आलेख काहीसा उतरता होत जातो हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यातूनही त्या आई बनल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या आणखीनच वाढतात. या सर्व गोष्टींना अभिनेत्री करिना कपूर खान मात्र अपवाद ठरली. करिनाने बाळाची चाहूल लागूनही तिचं काम थांबवल नाही. याउलट गरोदरपणातील दिवसांमध्ये तिने अधिकाधिक काम करण्यावर भर दिला. जाहिरात, फोटोशूट, रॅम्पवॉक यासारख्या गोष्टींतून तिने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यामुळे गरोदरपणातही काम करण्यासाठी ती अनेक स्त्रियांकरिता प्रेरणादायी ठरली. पण, तुम्हाला माहितीये का गरोदरपणात काम करणारी करिना ही एकमेव अभिनेत्री नाही. याआधी काही बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्रींनी त्या दिवसांमध्येही काम करून एक नवा पायंडा रचला होता.

जुही चावला
‘एक रिश्ता’ आणि ‘आमदनी अठ्ठणी खर्चा रुपय्या’ या चित्रपटांच्या वेळी अभिनेत्री जुही चावलाला तिच्या पहिल्या बाळाची चाहूल लागली होती. त्यानंतर तिने ‘झंकार बिट्स’मध्ये काम केले तेव्हा ती दुसऱ्यांदा गरोदर होती. तेव्हा तिला सातवा महिना सुरु होता.

जया बच्चन
‘शोले’ या चित्रपटात काम करताना जया बच्चन या गरोदर होत्या असे म्हटले जाते. स्वतः अमिताभ यांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितलेले की, शोले चित्रपटात आमची मुलगी श्वेताचंसुद्धा योगदान राहिलं आहे. त्या चित्रपटात एका दृश्यामध्ये मी जया यांना चावी द्यायलो जातो असे दाखवण्यात आलं होतं. ते दृश्य जया यांनी गरोदर असताना चित्रीत केलं होतं.

स्कार्लेट जॉन्सन
पहिल्याच बाळाची चाहूल लागेली असताना हॉलिवूड अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सनने ‘अॅव्हेन्जर्स : एज ऑफ अल्ट्रॉन’ या चित्रपटात काम केले. चित्रपटात काही दृश्यांमध्ये बॉडी डबलचा वापर न करता तंत्रज्ञानाचा वापर करून तिचे बेबी बम्प लपवण्यात आले होते.

हॅली बेरी
२०१३ साली आलेल्या ‘एक्स मेन : डेज ऑफ फ्युचर पास्ट’ या चित्रपटावेळी हॅली गरोदर होती.
गरोदर असतानाही काम करणाऱ्या या अभिनेत्रींच कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण, अशा अनेक महिला आहेत ज्या गरोदर असतानाही घर, ऑफिस आणि इतर कामांसोबत स्वतःची आणि त्यांच्याभोवती असणाऱ्या व्यक्तींची काळजी घेतात. अशा महिलांचेही कौतुक करावे तितके कमीच आहे.

Story img Loader