शुक्रवारी गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि बाप्पाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. गणेशोत्सव काळात सर्वत्र उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. यावेळी एकाहून एक सरस अशी गणपतीची गाणी ऐकायला मिळतात. नुकतंच लालबागच्या राजाचं गाणं प्रदर्शित करण्यात आलं. रोहन-रोहन यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. ‘आला रे बाप्पा मोरया’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. अवधूत गुप्तेच्या आवाजातील गाणं मंत्रमुग्ध करणारं आहे.

लालबागचा राजा मंडळाकडून हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. रोहन प्रधान आणि रोहन गोखले या संगीत दिग्दर्शक जोडीने याआधीही गणपतीची गाणी संगीतबद्ध केली आहेत. याआधी त्यांनी चेंबूरच्या टिळकनगर येथील गणपतीसाठीही गाणं संगीतबद्ध केलंय. ‘आला रे बाप्पा मोरया’ या गाण्यात नाविन्य पाहायला मिळतंय. यामध्ये रॅपचा समावेश करुन गाण्याला एक नवीन टच देण्याचा प्रयत्न रोहन-रोहन यांनी केलाय.

yeh hai mohabbatein fame krishna mukherjee shocking revelations about the Shubh Shagun producer of her show and reveals of being harassed
“निर्मात्याने मेकअप रुममध्ये केलं बंद अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग, म्हणाली…
shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर
janhvi kapoor walked barefoot with boyfriend shikhar pahariya mother smruti shinde
Video: जान्हवी कपूरचं ठरलं? बॉयफ्रेंडच्या आईसह अनवाणी चालत गेली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, प्रणिती शिंदेंचा भाचा आहे शिखर
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

या अनुभवाविषयी सांगताना रोहन गोखले म्हणतो की, ‘दरवर्षी गणेशोत्सवात आम्हाला गणपतीची गाणी संगीतबद्ध करायला मिळतात याचा खूप आनंद आहे. यंदा लालबागचा राजासाठी ही संधी मिळाली.  हे गाणं मराठी लोकांसोबतच इतर भाषिकांनाही जवळचं वाटावं हा विचार मनात होता. त्यामुळे यामध्ये रॅपचा समावेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अगदीच स्टायलिश न करता गणेश मंत्रांचा वापर करत या रॅपची निर्मिती केली.’