‘फ्रेण्डस्’ या लोकप्रिय शोचे जगभरात मोठे चाहते आहेत. दोन दशकं या शोने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.  अनेक चाहत्यांना आपल्याला या शोबद्दल सर्व माहित असल्याचा विश्वास आहे. मात्र अनेकांना या शोसोबत जोडल्या गेलेल्या अमानी लेयल आणि तिच्या संघर्षाबद्दल  फारशी कल्पना नसेल.

‘फ्रेण्डस्’ शोच्या सेटवर अमानी लेखकाची असिस्टंट म्हणून काम करत होती. या काळात तिला लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला होता. या प्रकरणामुळे अमानी फारशी प्रकाशझोतात आली नाही. दोन तीन वर्षात केवळ तीन चार वेळा मीडियामधून अमानीच्या संघर्षावर भाष्य केलं गेलं. मात्र अमानीने या लैंगिक आणि वर्णद्वेषी छळा विरोधआत लढा दिला.

अमानीचा फ्रेण्डस शोच्या सेटवरील संघर्ष
फ्रेण्डस शोच्या सहाव्या सिझनवेळी अमानीला लेखकाची असिस्टंट म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. सेटवर असताना अमानीचे सुपरवायझर तिच्यावर वेळोवेळी लैंगिक आणि वर्णद्वेषी कमेंट करायचे. या कमेंटमुळे बऱ्याचदा अमानीचं कामात लक्ष लागणं कठीण झालं होतं. अनेकदा लेखक काम सोडून लैगिंक गोष्टींवर चर्चा करण्यात जास्त वेळ घालवत असल्याचा आरोप अमानीने केला होता. आमानीने केलेल्या एका आरोपत ती म्हणाली, ” सेटवर लेखक एका अभिनेत्रीच्या प्रजनन समस्यांबद्दल बोलत असताना त्यांनी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली होती. ‘तिच्या योनीत वाळलेल्या फांद्या.’ असं अत्यंत विकृत वक्तव्य केल्याचा आरोप अमानीने केला होता.

आणखी वाचा- ‘फ्रेण्डस्’ शोच्या शूटिंगवेळी फिबी होती प्रत्यक्षात गरोदर; म्हणून निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

सहा वर्ष न्यायालयीन लढा

अमानीला फ्रेण्डस् शोच्या सेटवर अनेकदा अपमानास्पद वागणुकीचा सामना कराना लागला. एवढचं नाही तर एके दिवशी तिला कामावरुन अचानक काढून टाकण्यात आलं होतं. “अमीनीचं काम चांगलं नसून ती खूप हळू टाइप करते.” असं किरकोळ कारण देत सुपरपायझरने अमानीला कामावरून काढून टाकलं .असं असलं तरी कामावर असताना अनेकांनी अमानीचं काम चांगलं असल्याचं म्हणत तिचं कौतुक केलं होतं.

या प्रकरणी अमानीने एचआरकडे तक्रारही केली होती. त्यानंतर तिने न्यायालयातही धाव घेतली. तिचा खटला सहा वर्षे चालला. त्यानंतर कॅलिफोर्नियाच्या सर्वोच्च न्यायालयाने तो बंद केला. या खटल्यात अमानीचा विजय झाला.