झी मराठी वाहिनीवर आज (६ जानेवारी, रविवार) प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग प्रसारित होणार आहेत. ‘लागीरं झालं जी’, ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि’ माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकांचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा खास मनोरंजनाचा रविवार ठरणार असं म्हणायला हरकत नाही.

झी मराठी वाहिनीवरील टीआरपी यादीत अग्रस्थानी असणारी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये वेगळं वळण आलं आहे. या मालिकेत सुलक्षणा बाईंची एण्ट्री झाली असून राधिकाची ३०० करोडची कंपनी, मालमत्ता बळकावण्याचा तिचा उद्देश आहे. तर दुसरीकडे गुरुनाथला शनायासोबत लग्न करायचं आहे पण त्याच्याकडे सध्या पैसे नाहीत. सुलक्षणा शनाया आणि गुरुनाथला एकमेकांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण गुरुनाथ शनायासोबत पळून जाऊन लग्न करणार आहे. त्यांचं लग्न पार पडणार का? राधिका हा लग्नाचा डाव कसा उलटणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना रविवारी पाहायला मिळणार आहेत.

वाचा : ..म्हणून कपिल शर्माने मानधनात केली तब्बल इतक्या लाखांची कपात 

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राणा आणि अंजली जरी विरोधक म्हणून एकमेकांसमोर असले तरीही दोघांमधलं प्रेम खुलतंय. अंजली राणाला तिच्यासोबत पुन्हा एकदा लग्न करण्याची मागणी करते. आता राणा नक्की काय करणार हे या विशेष भागात पाहायला मिळेल.

‘लागीरं झालं जी’ मालिकेत शीतल मामींना हाताशी घेऊन हर्षवर्धन आणि जयश्री यांना त्यांच्या घरी रवाना करायच्या प्रयत्नात आहे आणि काही प्रमाणात ती यशस्वी देखील होते. पण हर्षवर्धनला शीतलच्या पुढील चालीची चाहूल लागताच तो काय करेल? या खेळात कोण कोणावर मात करणार हे प्रेक्षकांना रविवारी संध्याकाळी ७ वाजता पाहता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.