बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. शाहरुख सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकताच शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एक नेटकऱ्याने शाहरुखला बेरोजगार आहेस का? असं प्रश्न विचारता शाहरुखने त्याला मजेशीर उत्तर दिले आहे.

शाहरुखने त्याच्या ट्विटवर अकाऊंटवरून चाहत्यांशी संवाद साधला. “मी १५ मिनिटांसाठी इथे आहे तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता”, अशा आशयाचे ट्वीट शाहरुखने केले होते. त्यासोबत शाहरुखने #AskSrk हे हॅशटॅग देखील वापरले आहे.

त्यावर एका नेटकऱ्याने प्रश्न विचारला की “आमच्या सारखे… तुम्हीपण बेरोजगार झालात का सर.” त्या नेटकऱ्याला उत्तर देत शाहरुख म्हणाला, “जे काही करत नाही त ते..” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “तुमची तब्येत कशी आहे?” त्याला उत्तर देत शाहरुख म्हणाला, “जॉन अब्राहम एवढी चांगली नाही पण माझी तब्येत ठीक आहे.”

शाहरूख तिन वर्षांनंतर आता ‘पठान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा एण्ट्री करणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader