हॉलीवूड, बॉलीवूड आणि इतर सर्व चित्रपटसृष्टींमध्ये मानाचा असा ऑस्कर पुरस्कार सोहळा येत्या २६ फेब्रुवारीला कॅलिफोर्निया येथे होईल. वर्णभेद आणि पक्षपात यावरून या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर कितीही टीका होत असली तरी या पुरस्कारासाठी सर्वांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. यंदाचा ऑस्कर पुरस्कार कोणा कोणाला मिळेल हे लवकरच आपल्याला कळेल. पण, हा भव्य पुरस्कार सोहळा होण्यापूर्वी यात नामांकन मिळालेले काही चित्रपट पाहणे फार गरजेचे आहे. ऑस्करमध्ये नामांकन मिळालेले चित्रपट हे उत्तम असणार यात शंका नाही. मात्र, त्यापैकी पुढील काही चित्रपट पाहून नक्कीच तुम्हाला भारावून टाकतील असे आहेत.

१. ‘अरायव्हल’ (Arrival)

main hoon na movie completed 20 years interesting facts
‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से
allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

golden-globes-amy-adams-arrival-image-for-inuth
सायन्स फिक्शन विभागातील हा चित्रपट भाषाशास्त्रज्ञावर आधारित आहे. या चित्रपटाचा विषय थेट पृथ्वीवासीय आणि परग्रहवासीय यांच्यातील संवादाशी निगडित आहे. एमी अॅडम्स आणि जेरेमी रेनर यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

२. ‘फेन्स’ (Fences)

fences-film-golden-globes-2017-image-for-inuth
चित्रपटात १९५० सालातील आफ्रिकन अमेरिकी कुटुंबाच्या अनुषंगाने तत्कालीन अमेरिकी समाजव्यवस्था दाखविण्यात आली आहे. त्या काळात एक आफ्रिकन-अमेरिकन पुरुष (डेन्झेल वॉशिंग्टन) आपली पत्नी (व्हायोला डेव्हिस) आणि मुलांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत असतो. ऑगस्ट विल्सन यांनी लिहलेल्या नाटकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.

३. ‘मँचेस्टर बाय द सी’ (Manchester By The Sea)

manchester-by-the-sea-film-image-for-inuth
आपल्या वैयक्तिक दु:खांचा उत्सव साजरा करायला बोस्टनहून मँचेस्टरमध्ये आलेल्या नायकाची मानसिक कुतरओढ दाखविणारा चित्रपट म्हणजे ‘मँचेस्टर बाय द सी’. या चित्रपटातील नायक ली चॅण्डलर (केसी अफ्लेक) बोस्टनमध्ये छोटी-मोठी कामे करणारा हरहुन्नरी आहे. कमालीच्या निर्विकारपणे तो हातात येणाऱ्या सर्व गोष्टी उरकतो आणि प्रसंगी बारमध्ये मद्य पिऊन धिंगाणा घालतो. पण त्याच्या या नित्यनेमाने चालणाऱ्या व्यवहारामध्ये एकाएकी खंड पडतो. मँचेस्टरमधील त्याच्या भावाच्या मृत्यूची वार्ता फोनवर येऊन धडकते. नाखुशीने तो मर्तिकाचे विधी उरकण्यासाठी मँचेस्टरमध्ये दाखल होतो. तिकडे थोडय़ाच दिवसांत त्याला भावाच्या सोळावर्षीय मुलाची जबाबदारी भावाने आपल्यावर टाकल्याचे लक्षात येते. कुटुंब आणि नातेसंबंधांहून लांब पडलेला ली वकिलाने मांडलेला हा प्रस्ताव धुडकावतो. मात्र काहीच दिवसांत गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध होण्याच्या वळणांवर येऊन ठेपतात.

४. ‘हिडन फिगर्स’ (Hidden Figures) hidden-figures-film-image-for-inuth
नासाच्या सुरुवातीच्या काळात अंतराळ कार्यक्रमाच्या धुरिणींवर ‘हिडन फिगर्स’ चित्रपट बेतला आहे. अमेरिकेच्या अंतराळ कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणा-या महिला गणितज्ज्ञ केथरिन जी जॉन्सन, डोरोथी वॉन आणि मेरी जॅक्सन यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. तरॅजी पी हॅन्सन, ऑक्टॅविया स्पेंसर आणि जेनेल मोने यांनी या भूमिका साकारल्या आहेत.

५. ‘जॅकी’ (Jackie)

jackie-film-golden-globes-2017-image-for-inuth
ऑस्करमध्ये नामांकित झालेला आणखी एक चरित्रपट म्हणजे ‘जॅकी’. या चित्रपटाची कथा माजी ‘फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका’ जॅकलीन केनडी यांच्यावर आधारित आहे. सदर चित्रपटात नताली पोर्टमन, पीटर सर्सगार्ड, ग्रेटा गर्वग, बिली क्रुडप यांनी भूमिका साकारल्या आहेत.

६. ‘मूनलाइट’ (Moonlight)

moonlight-film-golden-globes-2017-image-for-inuth
मियामीतील गुन्हेगारी जगतात एका व्यक्तीचा जन्मापासून ते विशिष्ट टप्प्यापर्यंतचा प्रवास दाखविणारा चित्रपट म्हणजे ‘मुनलाइट’. हा चित्रपट गरीब कृष्णवर्णीय मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे.

७. ‘लायन’ (Lion)

dev-patel-lion-film-image-for-inuth
भारतात हरविलेले लहानपण शोधायला ऑस्ट्रेलियातून निघालेल्या व्यक्तीची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘लायन’. हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे.  सरू ब्रायरर्ली या ऑस्ट्रेलियात दत्तक गेलेल्या मुलाने तीन दशकांनंतर भारतात हरविलेल्या आपल्या घराचा शोध गुगलमॅपच्या आधारे घेतला. येथील कुटुंबाच्या भेटीनंतर त्याने त्यावर लिहिलेल्या ‘ए लाँग वे होम’ या आत्मवृत्ताचा चित्रपटीय आविष्कार ‘लायन’ या नावाने यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत सहा नामांकनासह दाखल झाला आहे.

८.  ‘हेल ऑर हाय वॉटर’ (Hell or High Water)

hell-or-high-water-film-image-for-inuth
‘हेल ऑर हाय वॉटर’मधील पार्श्वभूमी आर्थिक मंदीला समरूप आहे. दोन भावांची कथा असलेल्या या चित्रपटात एक भावाचा घटस्फोट झालेला दाखविण्यात आला असून दुसरा भावाचा भूतकाळ हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला दाखविण्यात आला आहे. आपल्या कुटुंबाचे पालनपोशन करण्यासाठी हे दोन्ही भाऊ चोरी करतात. याच घटनेवर चित्रपटाची कथा आधारित आहे.

९. ‘हॅकसॉ रिज’ (Hacksaw Ridge)

hacksaw-ridge-image-for-inuth
मेल गिब्सनचा ‘हॅकसॉ रिज’ हा हत्यार न उचलता युद्धात उतरणाऱया सैनिकाबद्दलचा चरित्रपट आहे. दुस-या महायुद्धाच्या काळावर हा चित्रपट बनविण्यात आला आहे.