कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत ऑस्कर मिळवण्याकरता चढाओढ लागलेली असते. हीच चढाओढ आणि कलाकारांची मांदियाळी यंदाच्या वर्षीही पाहायला मिळणार आहे. रेड कार्पेटची शान आणि सोबत पुरस्कार विजेत्यांनी केलेले भावना व्यक्त करणारे भाषण या सर्वांकडे प्रेक्षकांच्याही नजरा लागलेल्या असतात. पण ऑस्करमध्ये असेही भावंडं आहेत ज्यांनी ऑस्करची ती बाहुली जिंकली आहे. चला तर मग ही भावंड नक्की कोण ते पाहूया…

 

फोटो सौजन्यः सोशल मीडिया
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

डग्लस आणि नॉर्मा शेरर
डग्लस यांनी आतापर्यंत पाच ऑस्कर पुरस्कार हे साऊंडसाठी आणि दोन स्पेशल इफेक्ट्ससाठी जिंकले. द बिग हाऊस (१९३०) तर नॉर्माने १९३० मध्ये द डिवोसी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
बोनस- नोर्माचे दीर दिग्दर्शक, निर्माता, लेखक हॉवर्ड हॉक्स यांनाही १९७५ अॅकडमी अवॉर्ड मिळवला होता.

 

फोटो सौजन्यः सोशल मीडिया
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

जॉन फॉनटेन आणि ओलिव्हिया दी हॅवीलाँ
जॉन यांना ससपिशिअन (१९४१) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तर ऑलिव्हिया यांना (१९४६) टू इच हीज ओन आणि द हेअरेस (१९४९) या दोन सिनेमांसाठी अॅकॅडमी पुरस्कार मिळाला. ऑस्करच्या इतिहासात या दोनच बहिणींना आतापर्यंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचा पुरस्कार मिळाला होता.

 

फोटो सौजन्यः सोशल मीडिया
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

शर्ली मॅकलेन आणि वॉरन बीएटी
शर्ली यांनी १९८३ मध्ये टर्म्स ऑफ एण्डरमेन्ट या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तर वॉरन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांचा १९८१ मध्ये रेड्स या सिनेमासाठी अॅकॅडमी पुरस्कार मिळाला होता. तर १९९९ मध्ये अॅकॅडमीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार, आरव्हिंग जी. थलबर्ग मेमोरियल अवॉर्ड मिळाला होता.

 

फोटो सौजन्यः सोशल मीडिया
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

इथल आणि लायनेल बॅरीमोरः
इथेल यांना नन बट द लोनली हार्ट (१९४४) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तर लिओनेल यांना ए फ्री सोल या सिनेमासाठी (१९३१) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

 

फोटो सौजन्यः सोशल मीडिया
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

इथन आणि जोएल कोएन
या कोएन भावंडांना सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेसाठी फर्गो (१९९६) ऑस्कर मिळाला होता. तर नो कन्ट्री फॉर ऑल्ड मेन (२००७) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पिक्चर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्तम रुपांतर पटकथा यासाठी पुरस्कार मिळाला होता. जोएल कोएन यांनी फ्रान्सेस मॅकडॉरमांडशी लग्न केले. फ्रान्सेस यांनाही फर्गो या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

 

फोटो सौजन्यः सोशल मीडिया
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

हरमॅन आणि जोसेफ मॅनकीवीझ
हरमॅन यांना (१९४१) सिटीझन केन या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेचा पुरस्कार मिळाला होता. तर अ लेटर टू थ्री वाइफ (१९५०) जोसेफ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पटकथा याच्यासाठी ४ पुरस्कार मिळाले होते. तर ऑल अबाउट इव्ह (१९५१) या सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी पुरस्कार मिळाला होता.

 

फोटो सौजन्यः सोशल मीडिया
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

निल आणि क्रीस कोरबॉल्ड
निल यांना बेस्ट व्हिज्यूअल इफेक्टसाठी २००० मध्ये ग्लॅडिएटर सिनेमासाठी तर २०१३ मध्ये ग्रॅव्हिटी या सिनेमासाठी दोनदा ऑस्कर मिळाला आहे. तर क्रीस यांना २०१० मध्ये आणि क्रीस कोरबॉल्ड यांनाही बेस्ट व्हिज्यूअल इफेक्टसाठी २०१० मध्ये इन्सेप्शन या सिनेमासाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

फोटो सौजन्यः सोशल मीडिया
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

जेम्स आणि विल्यम्स गोल्डमन
जेम्स यांना (१९६८) द लायन इन विंटर या सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट रुपांतरीत पटकथेसाठी पुरस्कार मिळाला होता. तर विल्यम्स यांना सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी बुच कॅसीडी अॅड सनडान्स किड (१९६९) आणि ऑल द प्रेसिडेंट मेन (१९७६) या दोन सिनेमांसाठी अॅकॅडमीक अवॉर्ड मिळाले होते.

 

फोटो सौजन्यः सोशल मीडिया
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

रिचर्ड आणि रोबर्ट शेरमन
शेरमन भावंडांनी दोन ऑस्कर पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. मेरी पॉपीन्स (१९६४) या सिनेमाच्या बेस्ट ओरिजिनल स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणे यासाठी हा पुरस्कार मिळाला होता.

 

फोटो सौजन्यः सोशल मीडिया
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

ज्युलियस जे. आणि फिलीप जी. एपस्टीन
एपस्टीन भावंडांना कॅसाब्लँका (१९४२) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट रुपांतरीत पटकथेचा अॅकॅडमी पुरस्कार मिळाला होता.