एखादा चित्रपट गाजल्यानंतर त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या मानधनाच्या आकड्यावर अनेकांच्याच नजरा जातात. कलाकारांच्या वाट्याला येणारं मानधन आणि त्याविषयी होणाऱ्या चर्चा हा मुद्दा कधीच नजरेआड जात नाही. पद्मावत चित्रपटाच्या बाबतीतही सध्या असच वातावरण पाहायला मिळतंय. या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या सहकलाकारांपेक्षा जास्त मानधन देण्यात आल्याच्या चर्चा यापूर्वीच रंगल्या होत्या. किंबहुना त्यानंतर अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या मानधनाच्या आकड्यामध्ये असणाऱ्या तफावतीवरही मतमतांतरं झाली.

मानधनाच्या याच मुद्द्यावर दीपिकाने ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टी स्पष्ट केल्या. ‘इतर अभिनेत्रींना किती मानधन मिळतं हे मला माहित नाही. पण, मला मिळणाऱ्या मानधनात मी नक्कीच समाधानी आहे. कारण योग्यतेनुसारच मला मानधन दिलं जातं’, असं दीपिका म्हणाली.

एखादा कलाकार ज्यावेळी जास्त् मानधन आकारतो तेव्हा तसे करताना तो चित्रपटावरही एक प्रकारचा भार देत असतो. सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार वगैरे या संकल्पना ऐकण्यास सोप्या वाटतात. पण, त्याची दुसरी बाजू कित्येकदा नजरेत घेतली जात नाही, असंही तिने स्पष्ट केलं.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

दीपिकाने मानधनाच्या आकड्यांविषयी आपलं मत मांडत आणखी एका गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. ती गोष्ट म्हणजे, पुरुष कलाकार आकारत असलेलं मानधन. पुरुष कलाकारांनी त्यांना मिळणाऱ्या मानधनाचे आकडे कमी करावेत तरच चित्रपटसृष्टीला त्याचा फायदा होईल, असं ती म्हणाली. ‘काही वेळी एखाद्या कलाकाराने त्याच्या कामाच्या मोबदल्यात जास्त माधनाची मागणी केल्यामुळे निर्माते तो चित्रपट साकारण्याचा विचारही सोडतात. पण, इथे अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्राच सक्रिय असणारे चेहरे अपवाद ठरतात. कारण, त्यांना या व्यवसायाविषयी संपूर्ण कल्पना असते’, या महत्तावाच्या मुद्द्यावर तिने प्रकाश टाकला. त्यासोबतच मुख्य भूमिकेत असणाऱ्या एका अभिनेत्रीला सर्वाधिक मानधन दिला गेलेला ‘पद्मावत’ हा बहुधा पहिलाच चित्रपट असल्यामुळे दीपिकाने त्याविषयीचा आनंदही व्यक्त केला.

Story img Loader