सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून, त्याला न्यायालयाने पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सलमानच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर कलाविश्व आणि चाहत्यांच्या वर्तुळातून निराशा व्यक्त करण्यात आली. अनेकांनीच सलमानविषयी सहानुभूती वाटत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र, सलमानची बाजू घेणं एका पाकिस्तानी अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर नाराजी व्यक्त करत पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेननं ट्विट केलं. पण तिच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिलाच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.

‘एका अशा विश्वात जिथे कोणतेच मानवाधिकार नाहीत, तिथे एका चांगल्या व्यक्तीला काही वर्षांपूर्वी प्राण्यांना मारल्याप्रकरणी शिक्षा दिली जात आहे. तुम्ही वाटल्यास माझ्यावर टीका करा, पण इथे काहीतरी चुकतंय. पण अशाच व्यक्तींनी आपली मदत केली आहे,’ असं ट्विट मावराने केलं. या ट्विटवरून अनेकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ‘तू मूर्ख आहेस का?, तू ज्या व्यक्तीचं समर्थन करतेयस, तोच व्यक्ती हिट अँड रन प्रकरणात सहभागी होता. त्याच व्यक्तीने महिला पत्रकारांना धमक्या दिल्या आहेत. समाजात त्या व्यक्तीमुळे चुकीचं उदाहरण लोकांसमोर येत आहे,’ अशा शब्दांत एका युजरने तिला सुनावलं. तर मावराने केवळ प्रसिद्धीसाठी ट्विट केल्याचा आरोप काहींनी केला.

https://twitter.com/MawraHocane/status/981854564579205121

https://twitter.com/odshek/status/981883528500703232

https://twitter.com/iamraghav_/status/981889939557068800

https://twitter.com/vikasgaurav12/status/981896649571090433

वाचा : काळवीट शिकारीसाठी ‘त्या’ दोघींनी सलमानला प्रवृत्त केलं; प्रत्यक्षदर्शीचा दावा

मावराने बॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे. ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून तिने २०१६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, तिला फारसं यश मिळालं नाही.