‘साराभाई वर्सेस साराभाई’ ही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. सतीश शाह, सुमित राघवन, रत्ना पाठक आणि रुपाली गांगुली यांच्या जबरदस्त अभिनयामुळे ही मालिका २००० च्या दशकात सुपरहिट ठरली होती. याच सुपरहिट मालिकेचं पाकिस्तानी वर्जन सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानमधील एका निर्मात्यानं ‘साराभाई वर्सेस साराभाई’ची नक्कल करुन एका नव्या मालिकेची निर्मिती केली असल्याचा दावा निर्माता आतीश कपाडिया यांनी केला आहे. शिवाय ही मालिका न पाहण्याची विनंती देखील त्यांनी आपल्या चाहत्यांना केली आहे.

Pakistani army soldiers
पाकिस्तानी लष्कराचे सैनिक गव्हाच्या शेतात करतायत तरी काय? ‘या’ VIDEO मुळे होतायत ट्रोल
Dhruv Rathe and his wife juli
‘ध्रुव राठीचं नाव रशीद, पत्नी पाकिस्तानी, दाऊदशी संबंध?’, व्हायरल मेसेजनंतर ध्रुव म्हणाला…
Pakistan Cricket Board Appoint Gary Kirsten as T20 Format Coach T20 World Cup 2024
T20 WC पूर्वी, पाकिस्तानची मोठी खेळी; भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?

आतीश कपाडिया यांनी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेची निर्मिती केली होती. नुकतेच त्यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या पाकिस्तानी साराभाईची माहिती प्रेक्षकांना दिली. “सकाळची सुरुवात एका फॉरवर्डेड लिंकनं झाली. लिंकवर क्लिक केलं तर समोर काय पाहतो… साराभाई वर्सेस साराभाईची हुबेहुब नक्कल. माझ्या मालिकेचं अनऑफिशयल रिमेक पाकिस्ताननं केलं होतं. ही तर दिवसाढवळ्या चोरी झाली. कृपया तुम्ही ही पाकिस्तानी मालिका पाहू नका.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट आतीश यांनी लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मालिकेचं नाव किंवा त्यांची लिंक वगैरे दिलेली नाही. शिवाय ज्या पाकिस्तानी मालिकेवर त्यांनी आरोप केला त्यांच्या निर्मात्यांनी देखील अद्याप या आरोपांवर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.