थुकरटवाडीत यंदा राजकीय वारे वाहणार आहेत. कारण ‘चला हवा येऊ द्या’मध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपा खासदार सुजय विखे यांनी हजेरी लावली आहे. राजकीय मैदानात दोन दिग्गज कुटुंबांचा दबदबा असलेले मुंडे व पवार एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. अशावेळी थट्टामस्करीतूनही राजकीय फटाकेबाजी होणार नाही अशी शक्यताच नाही.

पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला

कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे आणि सुजय विखे यांच्या पत्नी धनश्रीसुद्धा सहभागी झाल्या होत्या. या सहभागी झालेल्या जोडप्यांमध्ये एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता आणि त्या वस्तूंमध्ये घडाळ्याचाही समावेश होता. योगायोगाने धनश्री आणि अमित यांनी रिंग टाकली आणि नेमकी ती घडाळ्यावर पडली. त्यानंतर “तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू”, असा टोला पंकजा मुंडेंनी रोहित पवारांना लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुजय यांची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत”, असा मिश्किल टोमणा पंकजांनी मारताच रोहित पवारांनीही त्याला मजेशीर प्रत्युत्तर दिलं. “घरच्यांना माहित असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे”, असं रोहित म्हणताच सेटवर एकच हशा पिकला.