दिवाळी हा उत्साहाचा अन् आनंदाचा सण आहे. दिव्यांचा लखलखता प्रकाश अन् आकाशात फटाक्यांची रोषणाई असं काहीसं वातावरण आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं. दरम्यान या आनंदाच्या वातावरणात सध्या अभिनेत्री परिणीती चोप्रा प्रचंड चर्चेत आहे. परिणीतीचे फोटो विविध प्रकारच्या फटाक्यांच्या पॅकेट्सवर पाहायला मिळत आहेत. या फोटोंमुळे परिणीला नेटकरी ट्रोल करत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे तिने देखील गंमतीशीर प्रत्युत्तर देऊन या ट्रोलर्सला शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
अवश्य पाहा – ‘रेप सीन पाहून आईनं घरातून बाहेर काढलं होतं’; रंजीत यांनी सांगितला थक्क करणारा अनुभव
Hahahha But please don’t burst crackers! Have a safe and quiet diwali #PollutionFree #SayNoToCrackers https://t.co/kXAXFhcFGQ
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) November 13, 2020
अवश्य पाहा – अभिनेत्रीने पाळल्या ८० हजार मधमाशा; कारण वाचून व्हाल थक्क
“परिणीती तू या फटाक्यांच्या ब्रँडचं देखील मार्केटिंग करतेस का?” अशा आशयाचे प्रश्न विचारुन काही नेटकरी अभिनेत्रीला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ट्रोलर्ससमोर परिणीतीने देखील माघार घेतली नाही. “हाहाहाहा…. कृपया फटाके फोडू नका. सुरक्षित आणि शांत राहून दिवाळीचा आनंद घ्या.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने ट्रोलर्सला इकोफ्रेंडली आणि प्रदुषणरहित दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.