बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. पायल रोहतगी हिला आज शुक्रवारी अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. पायल ज्या सोसायटीत राहते त्या सोसायटीच्या चेअरमनशी तिचा वाद झाला आहे. या वादानंतर तिने सोशल मीडियावर अश्लील शब्द वापरल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. त्यानंतर तिने ती पोस्ट डिलीट केली होती.

इतकेच नाही तर पायलवर सोसायटीतील लोकांशी वारंवार भांडणे व चेअरमनला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे की, २० जून रोजी सोसायटीत बैठक झाली आणि पायल बैठकीची सदस्य नसतानाही तिथे पोहोचली आणि बोलू लागली. जेव्हा चेअरमनने तिला अडवले तेव्हा पायलने सर्वांसमोर त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर, सोसायटीत मुलं खेळतात त्यांच्यावरून देखील पायलने अनेक वेळा भांडण केलं आहे.

आणखी वाचा : ‘दोन मुलांची आई असल्याने मला काम मिळतं नाही..’, अभिनेत्रीने केला खुलासा

या आधी २१ सप्टेंबर २०१९ रोजी पायलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये माजी स्वातंत्र्यसैनिक मोतीलाल नेहरू, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले होते. त्यानंतर पायल विरोधात तक्रार दाखल केली गेली, त्यानंतर तिला राजस्थानच्या बूंदी पोलिसांनीही अटक केली. मात्र, नंतर अभिनेत्रीला राजस्थान कोर्टाकडून जामीन मिळाला.

आणखी वाचा : “आमच्या सारखे… तुम्हीपण बेरोजगार झालात का सर,” नेटकऱ्याच्या खोचक प्रश्नावर शाहरुख म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पायलने ‘ये क्या हो रहा है’, ‘रिफ्यूजी’, ‘रक्त’, ‘३६ चायना टाउन’, ‘ढोल’, ‘दिल कबड्डी’ अशा चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती ‘बिग बॉस’, ‘फियर फॅक्टर इंडिया २’ सारख्या टीव्ही शोमध्येही होती.