बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान Aamir Khan त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्यावेळी स्वतःमध्ये काही ना काही बदल घडवून नेहमीच त्याच्या चाहत्यांना धक्का देत असतो. ‘दंगल’साठी त्याने वाढवलेले वजन आणि त्यानंतर पुन्हा जीममध्ये घाम गाळून कमविलेली पिळदार शरीरयष्टी सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली होती. त्याने साकारलेली तरुण आणि प्रौढ महावीर सिंग यांची भूमिका प्रेक्षकांपासून समीक्षकांनाही भावली. त्यानंतर आता आमिर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळेस मात्र त्याची पिळदार शरीरयष्टी दिसत नसून अगदीच बारीक झालेला आमिर सर्वांसमोर आला आहे. त्याचा हा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाचा : अखेर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील पोपटलाल अडकणार लग्नाच्या बेडीत?

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे Thugs of Hindostan चित्रीकरण सध्या माल्टा येथे सुरु असून, तेथे काही चाहत्यांना आमिरसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. ‘दंगल’मधील आमिर आणि आताचा आमिर पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. डोळ्यावर मोठा चष्मा, मिश्या आणि विस्कटलेले केस असा त्याचा लूक आपल्याला या फोटोत पाहायला मिळतो. ‘दंगल’मधील आमिरच्या फोटोची तुलना करणारा हा खाली दिलेला फोटो पाहून त्याच्यात झालेला बदल तुमच्याही लक्षात आला असेल.

aamir-khan-7592

‘दंगल’च्या वेळी खऱ्या महावीर सिंग फोगट यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी आमिरने जवळपास २०-२५ किलो वजन वाढवले होते. त्यावेळी त्याचे वजन ९८ किलोपेक्षाही जास्त होते. त्यानंतर त्याने पुन्हा वजन घटवले आणि तो ७० किलोवर आला. सूत्रांच्या माहितीनुसार, पीके (२०१५) आणि धुम ३ (२०१३) या चित्रपटांच्यावेळी त्याचे इतके वजन होते.

दरम्यान, ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आमिरने तो कश्याप्रकारे चित्रपटांची निवड करतो याबाबत सांगितले. ‘मी आतापर्यंत जे चित्रपट केले ते सर्व माझ्या हृदयाच्या जवळ आहेत. चित्रपटाने किती व्यवसाय केला यावरून मी चित्रपटांमध्ये तुलना करत नाही. ‘दंगल’प्रमाणेच ‘तारे जमीन पर’सुद्धा माझ्या खूप जवळ आहे. त्याचप्रमाणे ‘पीके’, ‘३ इडियट्स’ आणि ‘लगान’. यांमध्ये मी वर्गीकरण करूच शकत नाही. सर्वच चित्रपट माझ्यासाठी एकसारखेच आणि महत्त्वाचे आहेत,’ असे आमिरने म्हटले.

बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी आमिर खूप उत्सुक आहे. याविषयी तो म्हणाला की, पहिल्यांदाच मी अमिताभ यांच्यासोबत काम करत असून त्यासाठी खूप उत्सुक आहे. माझं स्वप्न पूर्ण होत आहे. मी नेहमीच त्यांच्या मोठा चाहता राहिलोय. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये अमिताभ, आमिर यांच्यासोबत कतरिना कैफ आणि ‘दंगल’ फेम फातिमा सना शेख यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader