बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ चित्रपट कोणीच विसरू शकत नाही. प्रेम आणि सुमनची प्रेमकहाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. चित्रपटात सलमानने प्रेमची तर त्याच्या प्रेयसीची म्हणजेच सुमनची भूमिका भाग्यश्रीने साकारली होती. सलमानसोबत स्क्रीन शेअर करत पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर भाग्यश्रीच्या करिअरची दणक्यात सुरुवात झाली. त्यानंतर तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या. पण, त्या सर्व ऑफर्स तिने नाकारल्या. चित्रपटसृष्टीतून तिचे असे अचानक दूर जाणे बहुतेक जणांना खटकले.

वाचा : Inside PICS .. अशी होती करिनाची बर्थडे पार्टी

१९९० साली हिमालय दासानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकला. त्यानंतर तिने मुलगा अभिमन्यू आणि मुलगी अवंतिका यांच्या संगोपनावर आपले लक्ष केंद्रित केले. तिची २२ वर्षीय मुलगी सध्या पदवी शिक्षण घेत असून, मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

४८ वर्षीय भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. फिटनेस, कुटुंबासोबतचे व्हेकेशन आणि तिच्या फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. इन्स्टाग्रामवरून ती आपल्या चाहत्यांना फिटनेसविषयी जागरुक राहण्याचा सल्ला द्यायलाही विसरत नाही.

वाचा : PHOTOS रणबीर कपूर, माहिरा खान करताहेत एकमेकांना डेट?

‘चित्रपटातील भूमिकेप्रमाणेच आईची भूमिकाही माझ्यासाठी फार महत्त्वाची होती. तो माझ्या आयुष्याचाच एक भाग आहे. सध्या मी आरोग्य, आहार, फिरणं या गोष्टींवरही लक्ष केंद्रित करतेय. त्यामुळे आता जर मला एखाद्या चित्रपटाची ऑफर आली तर मी ती नक्कीच स्वीकारेन’, असे स्वतः भाग्यश्रीने तिच्या फेसबुक पोस्टमधून एकदा स्पष्ट केले होते.