बिग बी अमिताभ बच्चन आणि साउश सेंसेशन रश्मिका मंदाना लवकरच ‘गुडबाय’ या सिनेमात एकत्र झलकणार आहेत. रश्मिकाला अगदी कमी काळातच मोठी प्रसिद्धी मिळाली असून. बॉलिवूडमध्ये देखील तिचं नशीब चमकलं आहे असं म्हणायला हरकत नाही. खास करून रश्मिकाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री करताच तिला बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान बिग बी आणि रश्मिकाच्या ‘गुडबाय’ या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो लीक झाला असून हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रश्मिका मंदानाच्या एका फॅन ग्रुपने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत बिग बी अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना एका सीनसाठी तयार होताना दिसत आहेत. या सिनेमातील बिग बींचा लूकदेखील चर्चेत आहे.

goodbye-amitabh-bachchan-rashmika-mandana
(Photo-instagram)

हे देखील वाचा: “अरे हिची कंबर कुठे गेली”; झीरो फिगरवरून अभिनेत्री मौनी रॉय ट्रोल

एका मुलाखतीत रश्मिकाने तिला बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला होता. सिनेमाची स्क्रिप्ट पाहून रश्मिकाने या सिनेमासाठी होकार कळवला होता. मात्र जेव्हा या सिनेमात अमिताभ बच्चन देखील आहेत हे रश्मिकाला कळालं तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता असं तिने मुलाखतीत सांगितलं होतं.

‘मिशन मजनू’ या सिनेमातून रश्मिकाने तिच्या बॉलिवूड पदार्पणाची घोषणा केली होती. तर लगेच त्यानंतर रश्मिकाने ‘गुडबाय’ या तिच्या दुसऱ्या बॉलिवूड सिनेमाचं शूटिंग सुरु केलं आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातही ती झळकली आहे.