सुप्रसिद्ध मराठी अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज झाले असून मीरा रोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. डोकेदुखीच्या त्रासानंतर विकासला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृतीत सुधारणा होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून विकासला डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यावर साधारण उपचारही त्याने घेतले. पण अचानक हा त्रास वाढल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विकासची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पुढील उपचार करायचे कसे, असा प्रश्न कुटुंबीय आणि मित्रांपुढे उभा राहिला आहे. विकासच्या उपचारासाठी विविध संस्था आणि नाट्य-सिनेसृष्टीतील लोकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनदेखील त्याचा कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनोदी अभिनेता म्हणून विकासने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘फू बाई फू’ या विनोदी कार्यक्रमातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्येही त्याने काम केले.