‘जेव्हा नवीन पोपट हा…’ या गाण्यापासून ते अगदी ‘पार्वतीच्या बाळा…..’ या गाण्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला थिरकवणारे, लाडके गायक आनंद शिंदे लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहेत. साई इंटरनॅशनल फिल्म आणि शिंदेशाही फिल्म प्रस्तुत ‘नंदू नटवरे’ या सिनेमाचे ते दिग्दर्शन करणार आहेत. हा धम्माल विनोदी चित्रपट असून, त्याच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होत असल्याचे समजते.

पॅरालिम्पिकमधल्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्याचा गौरव, जाणून घ्या कोण आहेत मुरलीकांत पेटकर?

नुकतेच या सिनेमाचे जुहू येथील अजीवासन स्टुडियोमध्ये सिनेमातील लोकगीताच्या रेकोर्डिंगसह मुहूर्तही पार पडला. हे लोकगीत खुद्द आनंद शिंदे यांनीच गायले असल्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या त्यांच्या गाण्यांमध्ये आता या लोकगीताचीदेखील भर पडणार आहे.
‘नंदू नटवरे’ सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, आनंद शिंदे यांचा मुलग उत्कर्ष आनंद शिंदेसुद्धा या सिनेमातून झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. आणखी एका कारणासाठी हा सिनेमा खास ठरतोय. कारण, शिंदेशाही समृद्धीचा सांगीतिक थाट या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या ‘साई अॅग्रो टेक’ या संस्थेअंतर्गत उमेश जाधव, शंभू ओहाळ, विजय जगताप आणि अरविंद अडसूळ निर्मात्याची धुरा सांभाळणार असून, अनेक नामवंत कलाकरांची भूमिका यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत सध्या गुप्तता बाळगण्यात आली असून, सोलापूर, भोर, मुंबई चित्रनगरीत चित्रित होत असलेला हा सिनेमा महागायक आनंद शिंदे यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.