बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी ९० च्या दशकात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, त्यानंतर अचानक पूजा चित्रपटसृष्टीपासून लांब गेली. पूजा चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्याचे कारण तिचा पूर्वाश्रमीचा पती फरहान फर्निचरवाल्याचे कुटुंब होते. तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे कुटुंबीय जुन्या विचारसरणीचे होते. त्यामुळे ती चित्रपटसृष्टीपासून लांब गेली. याचा खुलासा स्वत: पूजाने एका मुलाखतीत केला आहे.

अभिनेता समीर सोनीसोबत पुजाने नुकतेच एक इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन केले. या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये पूजाने चित्रपटसृष्टीमधून अचानक निघून जाण्याचे कारण सांगितले आहे. “मी चित्रपटसृष्टीत असताना मला खूप मजा आली. त्यांनतर काही काळ गेला आमि मी लग्न केलं. माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीने मला सांगितले की जर मी त्याच्याशी लग्न करणार असेल तर मला चित्रपटांमध्ये काम करता येणार नाही कारण त्याचं कुटुंब हे जुन्या विचारसरणीच आहे,” असं पूजा म्हणाली.

पुढे पूजा म्हणाली, “माझ्या आईने मला नेहमी शिकवलं, तुम्ही जे काही करता ते तुम्ही तुमचं १०० टक्के देऊन करा नाही तर करू नका. म्हणून मी म्हणाली ठीक आहे. जर मी गृहिणी आणि पत्नी होणार असेल तर त्यात मी सर्वोत्कृष्ट असायला पाहिजे. मी विचार केला ठीक आहे मी माझ्या आयुष्याचा हा प्रवास सोडून, माझ्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरूवात करेन.”

आणखी वाचा : ‘द फॅमिली मॅन २’: दोन तास आधीच झाली प्रदर्शित, चाहत्यांनी ट्विटरवर व्यक्त केला आनंद

पुढे पूजा तिच्या त्या निर्णयांबद्दल म्हणाली, “जेव्हा तुम्ही तरुण असता तुमची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते, बरोबर ना? आज जर माझ्या समोर अशी परिस्थिती आली तर माझे निर्णय वेगळे असतील. पण, सत्य हेच आहे की त्यावेळी घेतलेले निर्णय हे त्या त्या वेळेसाठी योग्यच होते. त्यामुळे मी जे निर्णय घेतली त्याबद्दल मी समाधानी आहे. म्हणूनच मी सर्वगोष्टी सोडून एक आदर्श पत्नी बनने पसंत केले.”

आणखी वाचा : मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दिशाने पहिल्यांदा केली पोस्ट

पूजा आणि फरहानचा २००३ साली घटस्फोट झाला. आलिया फर्निचरवाला ही पूजा आणि फरहानची मुलगी आहे. गेल्या वर्षी आलियाने सैफ अली खानच्या ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Story img Loader