महाराष्ट्रात येत्या १४ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘लपाछपी’ या चित्रपटाने सध्या लंडन गाठले आहे. लंडन येथे होत असलेल्या ‘लंडन इंडियन फिल्म फेस्टिवल’साठी या चित्रपटाला आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे सातासमुद्रापार पोहोचलेल्या मराठी चित्रपटांच्या यादीत सामील झालेला हा चित्रपट लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये देखील झळकला आहे.

वाचा : जाणून घ्या, मराठी कलाकारांचे मानधन

ipl 2024 dhruv jurel salute his father ekana stadium wins heart sanju samson rr vs lsg
PHOTO : मुलगा धुव्र जुरेलची प्रत्यक्ष खेळी पाहून गर्वाने फुलली सैनिक वडिलांची छाती; मुलाचीही अर्धशतकाद्वारे वडिलांना सलामी!
Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
Bengluru
VIDEO : ‘जय श्री राम’ म्हटल्याने बंगळुरूमध्ये तिघांवर हल्ला, झेंडाही पळवला
What Supriya Sule Said?
“जो तुम्हाला धमक्या देतो आहे, त्याला..”, सुप्रिया सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्या?

अभिनेत्री पूजा सावंत हिची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. दरम्यान, या फिल्म फेस्टिव्हलला पूजानेही हजेरी लावली. यावेळी पूजाचा बोल्ड अंदाज पाहावयास मिळाला. काळ्या रंगाच्या गाउनमधील पूजाचा बोल्ड लूक आपल्याला या फोटोत पाहावयास मिळत आहे. उंच आणि कमनीय बांधा असलेली पूजा या ड्रेसमध्ये अधिकच सुंदर दिसतेय यात शंका नाही.

pooja-sawant

काही दिवसांपूर्वीच पूजाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ती गरोदर असल्याचं दिसत होता. तो सगळा पब्लिसिटीसाठी केलेला फंडा होता हे आम्ही तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं. तर हा सगळा पब्लिसिटी स्टंट ‘लपाछपी’ या चित्रपटासाठीच होता.

वाचा : सुव्रत-मृण्मयीच्या ‘लग्ना’चा फोटो पाहिलात का?

लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी ‘लपाछपी’ या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे. विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १५ पुरस्कारांवर या चित्रपटाने बाजी मारली असून, हडसन, ओहायो येथील इंटरनॅशनल हॉरर हॉटेलचा पुरस्कार देखील ‘लपाछपी’ या चित्रपटाने आपल्या नावे केलाय. शिवाय  २०१६ साली माद्रिद येथे झालेल्या माद्रिद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला पाच नामांकने देण्यात आली होती. ज्यात पूजाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला स्पिरीट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.

मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स  प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर निर्मित ‘लपाछपी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. तसेच याचे लेखन चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल पटेल या दोघांनी मिळून केले आहे.

l-r-aruna-bhat-pooja-sawant-vishal-furiya