मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने राज कुंद्रा प्रकरणात उडी घेतली आहे. पूनम पांडेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीशी संबंधित लोकांवर फौजदारी खटला दाखल करण्याची विनंती केली आहे. राज कुंद्राच्या अश्लील व्हिडीओ अ‍ॅप संबधतीत हे प्रकरण असून पूनम पांडेने राज कुंद्रावर काही गंभीर आरोप केले आहेत.

पूनम पांडेने केलेल्या आरोपांमध्ये ती म्हणाली,”मला धमकी देत माझ्याकडून जबरदस्तीने कॉन्ट्रॅक्टवर सही करून घेण्यात आली.” असं सांगत पूनमने या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिण्यात आलं होतं याचा देखील खुलासा केलाय. ती म्हणाली यात, “मला शूट करावं लागेल, मला त्यांना अपेक्षित असलेल्या पद्धतीने पोज द्याव्या लागतील असं म्हंटलं होतं आणि मी तंस न केल्यास माझ्या काही खासगी गोष्टी लीक केल्या जातील.” असं या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिल्याचं पूनम म्हणाली.

हे देखील वाचा: अश्लील व्हिडीओत किती कमाई होते माहित्येय? राज कुंद्राचं दिवसाचं उत्पन्न ऐकून व्हाल थक्क!

पुढे पूनम पांडेने एक धक्कादायक खुलासा केला. “मी या करारावर सही करण्यास इच्छूक नव्हते. मला करार रद्द करायचा होता. तेव्हा त्यांनी माझा मोबाईल नंबर लीक केला. ज्यात ‘मला आता फोन करा. मी तुमच्यासाठी माझे कपडे उतरवेन.’ असं म्हंटलं होतं. त्यानंतर मला हजारो फोन आले आणि फोन करणारे माझ्याकडे विचित्र मागण्या करत होते. लोकांनी मला अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली.” असं म्हणत या प्रकरणानंतर पूनमला घर सोडवं लागल्याचं ती म्हणाली.

पूनम पांडेने राज कुंद्रा प्रकरणात अडकलेल्या अनेक तरूणींना पुढे येऊन आपली बाजू माडण्याची विनंती केली आहे. २०१९सालामध्ये देखील पूनम पांडेने या आधी राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले होते. पूनमने राज कुंद्रा आणि त्याचा सहयोगी सौरभ कुशवाहा या दोघां विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्रा आणि त्याची कंपनी बेकायदेशीररित्या तिच्या फोटोंचा आणि व्हिडीओचा वापर करत असल्याचा आरोप पूनमने केला होता.

हे देखील वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर-४’ शोमधून बाहेर?; ‘ही’ अभिनेत्री घेणार शिल्पाची जागा

२३ जुलै पर्यंत पोलिस कोठडी

राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले. राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. या प्रकरणी त्याला २३ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.