अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. यातच आता कायम चर्चेत असलेली मॉडेल पूनम पांडेने या प्रकरणावर तिची प्रतिक्रिया दिलीय.

पूनम पांडेने या आधीच राज कुंद्रावर फसवणू आणि पैसै न दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. असं असलं तरी पूनम पांडेने राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या मुलांबद्दल सहानभूती व्यक्त केलीय. ती म्हणाली की “या वेळी मी फक्त शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या मुलांचा विचार करतेय. असं पूनम पांडे म्हणाली.

हे देखील वाचा: “पैसै कसे कमवता?”; ‘द कपिल शर्मा शो’मधील राज कुंद्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पूनम पांडे म्हणाली, ” यावेळी मी शिल्पा शेट्टी आणि तिच्या मुलांसाठी चिंतेत आहे.सध्या शिल्पा आणि तिच्या मुलांची स्थिती कशी असेल याचा मी विचारही करू शकत नाही. मी सध्याच्या प्रकरणात माझ्या समस्या मांडून कोणतीही संधी घेऊ इच्छित नाही. त्यामुळे मी सध्या या प्रकरणातबद्दल फार काही बोलणार नाही. फक्त एक गोष्टी नमूद करायची आहे ती म्हणजे २०१९ सालामध्ये मी राज कुंद्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर फसवणूक आणि चोरीच्या आरोपांखाली उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. ते प्रकरण अद्याप विचाराधीन असल्याने मी सध्याच्या प्रकरणावर काही बोलू इच्छित नाही.”

आणखी वाचा: पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूनम पांडेने या आधी राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले होते. पूनमने राज कुंद्रा आणि त्याचा सहयोगी सौरभ कुशवाहा या दोघां विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्रा आणि त्याची कंपनी बेकायदेशीररित्या तिच्या फोटोंचा आणि व्हिडीओचा वापर करत असल्याचा आरोप पूनमने केला होता. पूनम आणि राज कुंद्राच्या कंपनीमध्ये एक करार झाला होता मात्र तो आता संपुष्टात आला आहे. यावेळी काही पैशांच्या देवाणघेवाणी वरूनही पूनमने आरोप केले होते. मात्र राज कुंद्राने पूनमचे आरोप फेटाळून लावले होते.