लोकप्रिय कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकांचे लक्ष असतं. त्यामुळे साहजिकच या कलाकारांनी एखादी वेगळी पोस्ट शेअर करताच त्याविषयीच्या चर्चांना उधाण येतं. सध्या मनोरंजन जगतात अशाच एका सेलिब्रिटीबद्दल चर्चा रंगत आहेत. त्या सेलिब्रिटीचं नाव आहे सेलेना गोमेज. पॉप स्टार म्हणून नावारुपास आलेल्या सेलेनावर नुकतीच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोवरुनच ही गोष्ट सर्वांसमोर उघड झाली. या फोटोमध्ये सेलेना रुग्णालात असल्याचं लक्षात येत असून, तिने मैत्रिणीचा हात घट्ट पकडला आहे.

हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलंय, ‘मला माहितीये की माझ्या चाहत्यांना काही प्रश्न पडले असतील. मी गेल्या काही दिवसांपासून अशी अचानक दिसेनाशी का झाली आहे, हाच प्रश्न त्यांना सतावतोय. किंबहुना माझ्या आगामी म्युझिक अल्बमच्या प्रसिद्धीमध्येही मी दिसत नाहीये. याबद्दल मी सर्व चाहत्यांना सांगू इच्छिते की, माझ्यावर नुकतीच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली असून, आता माझ्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे.’

वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेलेनाची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळताच अनेकांना धक्का बसला. पण, त्याहीपेक्षा इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलेल्या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं. ‘ही गोष्ट मी तुम्हा सर्वांना सांगणार होते. कुटुंबाने, डॉक्टरांच्या टीमने माझी फार काळजी घेतली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. मात्र, मी फ्रॅन्शिआ रेसा या माझ्या मैत्रिणीचे सर्वाधिक आभार मानते. परंतु, कोणत्या शब्दांत तिचे आभार मानू, हे मला कळेनास झालंय. तिने तिची किडनी मला दिली आहे. त्यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, असे सेलेनाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे. सेलेनाची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहत्यांनी ती रिपोस्ट करत तिच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.