‘ससुराल सिमर का’, ‘पुनर्विवाह’, ‘एक वीर की अरदास वीरा’ आणि ‘मधुबाला’ यासारख्या अनेक मालिकांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री शगुफ्ता अली सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शगुफ्ता या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आज त्याच शगुफ्ता आर्थिक संकटाचा सामना करत आहेत एवढंच नाही तर त्यात भर म्हणजे त्या आजारी आहेत.

शगुफ्ता यांनी नुकतीच ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शगुफ्ता यांनी त्यांच्या आर्थिक संकटासोबत त्यांच्या आजरपणा बद्दल सांगितले आहे. “मी गेल्या २० वर्षांपासून आजारी आहे. पण त्यावेळी मी तरूण होते आणि मी ते सांभाळू शकत होते. मला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग झाला होता. मी त्याला लढा दिला आणि मी वाचली. पहिल्यांदाच मी याबद्दल सगळ्यांना सांगत आहे. या आधी हे फक्त माझ्या काही जवळच्या मित्रांना सोडून कोणालाच माहित नव्हतं, असे त्या म्हणाल्या.

आणखी वाचा : रणवीरचा ऑडिशन व्हिडीओ पाहून तुम्हाला ही होईल हसू अनावर

पुढे त्या म्हणाल्या, “जेव्हा माझ्या हातात बरीच कामं होती तेव्हा मला ब्रेट कॅन्सर असून तिसऱ्या टप्यात असल्याचे समजले. यावेळी माझ्या अनेक सर्जरी झाल्या. प्रत्येक केमोरेथेरपीला असे वाटायचे की माझा नवीन जन्म झाला आहे. त्यावेळी मी माझं काम आणि जबाबदाऱ्यांसाठी पूर्णपणे समर्पित होती की शस्त्रक्रियेच्या १७ दिवसानंतर मी माझ्या छातीवर उशी लावून मालिकेच्या चित्रीकरणासाठी दुबईला गेली होती.”

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल

त्यांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी बोलताना शगुफ्ता म्हणाल्या, शूटच्या वेळी त्यांचे अनेक अपघात झाले. पाय दुखापत झालीत. एकदा त्या वडिलांना भेटायला जात असताना, शगुफ्ता यांचा एक मोठा अपघात झाला, ज्यामध्ये त्यांच्या हाताच एक हाड मोडलं आणि त्यांच्या हातात एक स्टीलचा रॉड घालावा लागला. अशा कठीण परिस्थितीतही शगुफ्ता काम करत राहिल्या.

आणखी वाचा : Video: पोटाची चरबी कमी करायची? मलायकाने दिल्या टिप्स

शगुफ्ता गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास १५ चित्रपट आणि २० मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘मेहंदी’, ‘हीरो नंबर १’ आणि ‘अजुबा’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.