स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे.

कार्तिक आणि तनुजा कॉलेज फ्रेण्ड्स आहेत. मात्र कॉलेजनंतर या दोघांची भेट कधी झाली नाही. आता मात्र एका अपघातानेच या दोघांची भेट घडवून आणली आहे. तनुजाच्या येण्याने मालिकेच्या कथानकात कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

आणखी वाचा : करण जोहरपासून लांब राहण्याचा सल्ला देणाऱ्याला दिव्यांकाचं सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे सौंदर्या काळ्या रंगाचा द्वेष का करते या गोष्टीचा छडा लावण्यासाठी दीपा कार्तिक जीवाचं रान करत आहेत. अश्यातच तनुजाच्या येण्याने हा गुंता वाढणार की सुटणार या प्रश्नांची उत्तरं रंग माझा वेगळाच्या पुढील भागांमधून लवकरच उलगडतील. ही मालिका दररोज रात्री ८ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.