सोमवारी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन अॅपवर प्रदर्शित केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. यापूर्वी ‘गंदी बात’मधील अभिनेत्री गहना वशिष्ठला वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ शूट करून वेबसाईटवर अपलोड केल्याच्या आरोपा खाली अटक करण्यात आली होती.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करताना अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
आणखी वाचा : राज कुंद्राला कशामुळे झाली अटक?; जाणून घ्या काय आहे प्रकरण
View this post on Instagram
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजवर अश्लील चित्रपट तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्राची चौकशी केली. चौकशीदरम्यान राज कुंद्राविरोधात काही पुरावे अढळल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणी एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे.