‘बाहुबली : द कॉन्क्लुजन’ या सुपरहिट चित्रपटानंतर आता प्रेक्षकांना प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या फर्स्ट लूकलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता ‘साहो’च्या चित्रीकरणाविषयी बरीच माहिती चाहत्यांसमोर आणली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफा या इमारतीवर या चित्रपटातील २० मिनिटांचं साहसदृष्य चित्रीत करण्यात येणार आहे.

‘मिड डे’ या वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, हे साहसदृष्य दुबईतील विविध भागात चित्रीत करण्यात येणार असून त्यातील महत्त्वाचा भाग खलिफा इमारतीवर चित्रीत करण्याची निर्मात्यांची इच्छा आहे. यामध्ये प्रभास एका व्यक्तीचा पाठलाग करत असल्याचं दाखवण्यात येणार आहे. मात्र, या चित्रीकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत.

https://www.instagram.com/p/Bak5yaNlTQo/

वाचा : प्रियांकाच्या अमेरिकेतील घराजवळ झाला दहशतवादी हल्ला 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘साहो’मधील या विशेष भागाच्या चित्रीकरणासाठी हॉलिवूडचा प्रसिद्ध अॅक्शन कोरिओग्राफर केन्नी बेट्सची निवड करण्यात आली आहे. केन्नी ‘ट्रान्सफॉर्मर’ (२००७) आणि ‘डाय हार्ड’ (१९८८)सारख्या हॉलिवूड चित्रपटांमधील साहसदृष्यांसाठी ओळखला जातो.
अॅक्शन थ्रिलर असलेला ‘साहो’ तेलगू आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात प्रभासव्यतिरिक्त श्रद्धा कपूर, अरुण विजय आणि नील नितीन मुकेश यांच्याही भूमिका आहेत. ‘रन राजा रन’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय.