सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.अनेकदा प्राजक्ता तिच्या लूकमुळे देखील चर्चेत राहते. मात्र प्राजक्ताने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे सध्या चाहत्यांची उत्सुकता ताणली गेलीय.
प्राजक्ता माळी ही सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचे सूत्रसंचालन करत आहे. नुकतीच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय. यात एक डायरी लिहितानाचा फोटो तिने शेअर केलाय. ज्यात “प्राजक्ताकडून लवकरच…एक सुंदर भेट” असं लिहिलेलं दिसतंय. तर प्राजक्ता कॅप्शनमध्ये म्हणाली, “माझ्या ह्रदयाच्या अतिशय जवळ असलेली गोष्ट…माझी गूपितं म्हणा हवं तर…लवकरच….खास तुमच्यासाठी” प्राजक्ताच्या या कॅप्शनमुळे प्राजक्ताची ही खास भेट नेमकी काय असा प्रश्न अनेकांना पडलाय.
View this post on Instagram
हे देखील वाचा: ‘तिसऱ्या मुलाच्या’ नावावरून करीना कपूरच्या अडचणी वाढण्याची शक्यता!
प्राजक्ताच्या या पोस्टवर अमृता खानविलकरसह तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. या पोस्टवरून प्राजक्ता एखादं पुस्तक रुपात तिची गुपितं उलगडणार का? अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.
जेव्हा प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
काही दिवसांपूर्वीच प्राजक्तासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोच्या टीमने वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी प्राजक्ताने एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता. “‘ग्रेट भेट! काल मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली. तिही ‘वर्षा’वर. काल साहेबांच्या हस्ते हास्यजत्रेच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. धन्यावाद मुळे काका. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब; व्यस्त वेळापत्रकातून सबंध १ तास आम्हाला दिल्याबद्दल, मनापासून कौतुक करून उत्साह वाढविल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद’ तिने असे कॅप्शन दिले होते. या कॅप्शनमध्ये प्राजक्ताने हॅशटॅग ‘आनंद पोटात माझ्या मायेना’ असे म्हटले होते..”