बॉलिवूडसारख्या चंदेरी दुनियेत कोणतेही प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत असे म्हणतात. पण म्हणून इथे कोणी प्रेमात पडत नाही असेही होत नाही. काही असेही जोडपी आहेत ज्यांनी उत्तर उदाहरणही जगासमोर ठेवली आहेत. सध्या बॉलिवूड मधले प्रेमात आकंठ बुडालेले जोडपे म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या सिनेमात ते पहिल्यांदा भेटले. या सिनेमा दरम्यानच त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतरही रणवीर तिला भेटण्यासाठी जवळपास तीन तास तो विमानतळावर हातात फुलं घेऊन तिची वाट बघत उभा होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे नाते ही तुटण्याच्या वाटेवर आहे अशा बातम्या येऊ लागल्या होत्या.

ranveer-deepika-7591

असे असले तरी दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीच काही सांगितले नाही. ‘बेफिक्रे’ अभिनेता मात्र नेहमीच त्याचे दीपिकासाठीचे प्रेम व्यक्त करत असतो. मुकेश अंबानी यांच्या पार्टीमध्येही हे दोघे हातात हात घालून फिरताना दिसले. याशिवाय सोमवारी दोघेही एका पुरस्कार सोहळ्यासाठी एकत्र दुबईला गेले. जेव्हा हे लव्ह बर्ड्स एकत्र असतात तेव्हा काही ना काही नवीन तर घडणारच ना? काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका पुरस्कार सोहळ्यात रणवीर पुरस्कार स्विकारायला जाताना दीपिकाला किस करताना दिसत आहे.

https://twitter.com/Popdiarieslive/status/803674443662790656

याशिवाय करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्येही त्याने सांगितले होते की, त्याला दीपिकासोबत लग्न करायला आवडेल. कारण ती एक लग्न करण्यासाठी योग्य अशीच मुलगी आहे. पण हे दोघे लग्न कधी करणार हा प्रश्न सध्या अनेकांनाच पडला आहे. दीपिकाच्या बाबांनी म्हणजे प्रकाश पदुकोण यांनी हा निर्णय त्या दोघांवरच सोपवला आहे. मिड-डेमध्ये आलेल्या वृत्तानुसार बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण म्हणाले की, ‘ते दोघंही प्रौढ आहेत आणि त्यांना माहिती आहे ते काय करत आहेत. एक पिता म्हणून दीपिकाला तिचे निर्णय स्वतः घेण्यासाठी मी नेहमीच मोकळीक दिली आहे. याबाबतीतही तिने तिचा निर्णय स्वतः घ्यावा असेच मला वाटते.’ सध्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा ‘पद्मावती’च्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहेत.

https://twitter.com/Popdiarieslive/status/803677457102479362