करोना विषाणूचा प्रसार रोखता यावा यासाठी सरकारकडून २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी सोडता लोकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. सर्व शूटिंग अनिश्चित काळासाठी रद्द केल्याने सेलिब्रिटीसुद्धा घरी बसले आहेत. अशा वेळी काही शब्द ब्रह्मांडातून गायबच झालेत असं म्हणत अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकने पत्नीसाठी भन्नाट पोस्ट लिहिली आहे.

प्रसादने या पोस्टमध्ये लिहिलं, ‘काही गोष्टी ब्रह्मांडातून गायबच झालेत…१- कुठे आहात? २ – घरी कधी येणार? ३ – जेवायला आहात ना?’ या पोस्टमध्ये त्याने पत्नी मंजिरी ओकला टॅग केलं आहे. प्रसादच्या या पोस्टवर भरभरून लाइक्स व कमेंट्स येत आहेत. सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, अमृता खानविलकर यांनीसुद्धा पोस्टवर हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे.

प्रसाद ओकची पत्नी मंजिरीनेही पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ‘लवकरात लवकर हे प्रश्न ब्रह्मांडात येवो.’ लॉकडाउनचा काळ लवकरात लवकर संपूर्ण सर्व पूर्वपदावर येवो अशीच इच्छा सामान्यांसह सेलिब्रिटीसुद्धा व्यक्त करत आहेत.