टोक्यो ऑलिम्पिक महाकुंभमध्ये शनिवारी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. नीरजच्या या सुवर्ण कामगिरीनंतर देशासह जगभरातून नीरजं कौतुक होतंय. संपूर्ण देशभरातून नीरजवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी देखील नीरजचं अभिनंदन केलंय. नीरजची ही प्रेरणादायी कामगिरी अनेक तरुणांना प्रोस्ताहन देणारी आहे.
लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनी देखील नीरजं कौतुक केलं आहे. एवढचं नव्हे तर नीरजच्या यशानंतर प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रातील शाळांमधून खेळाडू घडवण्याची गरज असल्याची इच्छा व्यक्त केलीय. प्रशांत दामले यांनी जवळचे कवी मित्र असलेल्या अमेय वैशपायन यांनी नीरजच्या यशानंतर लिहिलेली खास कविता शेअऱ केलीय.
“वाजली वाजली धून आपली पहा
झेपावत दूर दूर गेला भाला पहा
अस्त्र जणू सुटले ते लक्ष त्याने गाठले
सोनेरी पदकासी त्याने कवटाळले
अभिमानास्पद कृती ही ऊर भरून राहिले
आमचेही जन गण मन आज जगी गाजले”
हे देखील वाचा: ‘मी आनंदाने उड्या मारते’, तापसी पन्नूने केले सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचे अभिनंदन
प्रशांत दामले यांनी ही कविता शेअर करत त्यांचे मित्र अमेय वैशंपायन यांचं देखील कौतुक केलंय. आपल्याला ही कविता खूपच भावली असल्याचं म्हणत त्यांनी कविता शेअर केलीय.
यासोबच प्रशांत दामले यांनी एक कमेंट करत खेळाडूंना प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं म्हंटंल आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील आंतर शालेय स्पर्धेत पहिल्या आलेल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं आणि त्यांच्या शाळेच्या अंतिम परीक्षेत त्यांना त्यासाठी किमान 15 गुण द्यायला हवेत. तर त्यांचे पालक पण आनंदी आणी आश्वस्त राहतील.” असं ते म्हणाले.
हे देखील वाचा: …आणि अक्षय कुमारने घेतले चक्क कपिल शर्माकडून आशिर्वाद
दरम्यान प्रशांत दामले यांनी मांडलेल्या या विचारांवर अनेक चाहत्यांनी त्यांचं समर्थन केलंय. शालेय पातळीवर क्रिडास्पर्धा किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देणं तसचं त्यांना पाठबळ देणं गरजेचं असल्याचं अनेक नेटकरी म्हणाले आहेत.