‘बालक- पालक’ या मराठी चित्रपटातून दमदार पदार्पण करणारा अभिनेता प्रथमेश परबने अल्पावधीतच चाहत्यांची मनं जिंकली. त्याच्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे हिंदी चित्रपटांचेही त्याला ऑफर्स येऊ लागले. आगामी ‘अन्य’ या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमेश बॉलिवूडमध्ये हॅट्रिक करत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सिम्मी लिखित आणि दिग्दर्शित ‘अन्य’ हा प्रथमेशचा तिसरा बॉलिवूड चित्रपट आहे. रोमॅण्टिक थ्रिलर असणाऱ्या या चित्रपटात प्रथमेश एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधान, गोविंद नामदेव, तेजश्री प्रधान आणि कृतिका देव या कलाकारांसोबत प्रथमेश स्क्रिन शेअर करणार आहे.

वाचा : ‘ठंड तो नहीं लग रही?’; दीप-वीरच्या रिसेप्शनवर गमतीशीर मीम्स व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या टीझरमधल्या प्रथमेशच्या डायलॉगबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. कोणतीही भूमिका सहज पण उत्तम साकारुन प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवण्यात नेहमीच यशस्वी ठरणारा प्रथमेश त्याच्या या हिंदी चित्रपटांमुळे चर्चेचा विषय ठरणार यात शंका नाही. ‘दृश्यम’, ‘खजूर पे अटके’ नंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.