मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. तसेच ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. नुकतच एका व्हिडीओमुळे हेमांगीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यानंतर स्त्रींयांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने चांगलेच सुनावले. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असून तिला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी कमेंट करत हेमांगीला पाठिंबा दिला आहे.

हेमांगीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या शिर्षकाखाली पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर बेधडक मत मांडले आहे. त्यानंतर प्रवीण तरडे यांनी कमेंट करत हेमांगीला पाठिंबा दिला आहे. “विचार म्हणून खतरनाक ऽऽऽऽ.. लेखन म्हणून वरचा दर्जा …साहित्य म्हणून कालातीत ..तू लढ हेमांगी” अशी कमेंट त्यांनी केली आहे.

सोनिया गांधींच्या राष्ट्रपतींवरील टीप्पणीवरून वादंग
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…
In Khadakpada area of ​​Kalyan West transgender beaten woman and her little daughter for 20000
कल्याणमधील खडकपाडा येथे तृतीय पंथीयांकडून महिलेला मारहाण
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
Shocking video in mumbai virar local train women fight video viral on social media spirit of mumbai
“आता जीव जाईल तिचा” विरार लोकलमध्ये महिलांनी अक्षरश: हद्द पार केली; भयंकर VIDEO पाहून विरार लोकलमध्ये चढताना १०० वेळा विचार कराल
Gashmeer Mahajani
“नाळ जोडली गेलेली…”, गश्मीर महाजनी महिला चाहत्यांबद्दल म्हणाला, “लहानपणापासून माझ्यावर महिलांचे…”

आणखी वाचा : “तुला अंतर्वस्त्र पाठवते” म्हणणाऱ्याला अनुषा दांडेकरचं सडेतोड उत्तर; म्हणाली…

hemangi kavi, paravin tarde, veena jamkar, hemangi kavi viral post, pravin tarde,

काय आहे हेमांगीची पोस्ट?

“ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या प्रतिमेचा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचाय हे लक्षात येतं! आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!”

हेमांगीच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्री वीणा जामकरनेदेखील पाठिंबा दिलाय. “क्या बात हेमांगी..सॉलिड , लय भारी … वाचून सुद्धा हायसं वाटलं गं …” असं वीणा म्हणाली आहे.

Story img Loader