प्रेमाला भाषा नसते, जात नसते, धर्म नसतो … असते ती फक्त भावना …. आणि या एका भावनेच्या भोवती प्रेमी युगलांचं अख्ख आयुष्य एकवटलेलं असतं.  झी युवावर  २७ फेब्रुवारीपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता एक नवी कोरी प्रेमाच्या विविध गोष्टी सांगणारी मालिका सुरु होत आहे. “प्रेम हे ” प्रेमात असलेल्या , आणि नसलेल्या प्रत्येकासाठी ही मालिका आहे. प्रेम करणे सोपे आहे पण ते निभावणे तेवढेच कठीण असते, असे म्हटले जाते. तरीही प्रेम करणारे प्रेम करतच राहतात.  प्रेम हे केवळ आपल्या जोडीदाराला मिळवणं नसत. त्या व्यक्तिसाठी मनाला पटेल आणि नातं टिकवेल असे सर्व करण्याची तयारी असते आणि कुठच्याही कारणाने आपल्या आवडत्या व्यक्तिला गमवावं लागलं तर मात्र ही गोष्ट आपल्यासाठी  खूप कष्टप्रद आणि त्रासदायक ठरू शकते. प्रेमाच्या अश्या असंख्य भावना अनेकांच्या मनात धुमसत असतात. शहरातील लोक बऱ्याच अंशी बोलून मोकळी होतात पण ग्रामीण भागात आजही अनेकांच्या प्रेमकहाण्या या अव्यक्तच राहिल्या आहेत. याच विषयाला धरून “प्रेम हे” या मालिकेची पहिली गोष्ट आहे “रुपेरी वाळूत “.  एका गावात राहणारे सुनील आणि राधिका  (वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान) , एकमेकांवर प्रेम तर करतात पण त्यांच्यासाठी व्यक्त होणं तितकसं सोपं नसतं. मग त्यांना जोडणारी आणि त्यांच्यातील प्रेम फुलवणारी गोष्ट म्हणजे एक गाणं “रुपेरी वाळूत …”  आणि या गाण्याबरोबर त्यांचं फुलत जाणार पण अव्यक्त प्रेम आणि याचबरोबर त्यांच्या प्रेमात आडवं येतं घर, समाज , गाव.

प्रेम म्हणजे उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विनलेलं नातं असत. जे मनात असतं ते शब्दात मांडता येत नाही. अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तिला केवळ पाहण्यात जीवनाचा अर्थ लागतो पण ती व्यक्ती आपली व्हावी ही भावना मनमोकळेपणाने तिलाही न सांगू शकणारे अनेकजण आपल्याला अनेक ग्रामीण भागात सापडतात. दोन जिवांचे मधूर मीलन म्हणजेच  प्रेम असतं. पण त्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न करण तेवढच महत्वाच असत. असे अनेक तरुण असतात की जे आपल्याला काय आवडतं त्याही पेक्षा तिला काय आवडतं हे महत्वाचं मानतात आणि तिच्या नकळत, ते तिला मिळवून देण्यासाठी धडपड करतात. या भावनेतही  प्रेमचं असतं.

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…

tejashree-vaibhav

झी युवावरील “प्रेम हे ” या मालिकेतील पहिली गोष्ट आहे “रुपेरी वाळूत “.  ग्रामीण भागातील अव्यक्त प्रेम भावना अधोरेखीत करणारी ही गोष्ट असून यात वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. या भागाचे दिगदर्शन  संतोष मांजरेकर यांनी केले असून सचिन तडाखे यांनी ही कथा लिहिली आहे.  समीर पेणकर यांचे सवांद आणि पटकथा आहे . “प्रेम हे” या मालिकेचे संगीत निलेश मोहरीर यांनी केले असून हृषिकेश रानडे आणि केतकी माटेगांवकर यांनी शीर्षक गीत गायले आहे .