अत्यंत कमी वेळात जबरदस्त प्रसिद्धी मिळवणारी प्रिया वारियर अनेकांच्याच परिचयाची झाली आहे. तिने अद्याप चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं नाही, पण त्यापूर्वीच एखाद्या बड्या सेलिब्रिटीप्रमाणे तिची प्रसिद्धी आहे. यासाठी कारण होतं, तिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या ट्रेलरमधील व्हायरल झालेला व्हिडिओ. याच प्रसिद्धीच्या जोरावर तिला बॉलिवूड चित्रपटांचेही ऑफर्स येऊ लागल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये झाल्या. मात्र या चर्चा अफवाच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटासाठी प्रियाची निवड करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने तिची दखल घेतली असून ‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंगसोबत ती स्क्रीन शेअर करणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रोहितने ‘सिम्बा’ या चित्रपटासाठी प्रियाचा विचारदेखील केला नव्हता.

https://www.instagram.com/p/BgTd7Q4gPum/

‘सिम्बा’मध्ये प्रियाची कोणतीच भूमिका नसून या चित्रपटासाठी तिचा विचारदेखील करण्यात आला नव्हता, असे चित्रपटाच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर यामध्ये मुख्य भूमिकेत नेमकी कोणती अभिनेत्री झळकणार हेसुद्धा निर्मात्यांकडून लवकरच जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रियाचे बॉलिवूड पदार्पण इतक्यात होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

https://www.instagram.com/p/Bf-w1kWDLha/

 

 

Story img Loader