बॉलिवूड सिनेसृष्टी जेवढी झगमगती दिसते तेवढीच ती आतून पोकळही आहे. आज ज्या कलाकारांना लोक सुपरस्टार म्हणून मानतात त्याच कलाकारांना उद्या लोक विसरतीलही हे आम्ही नाही तर इतिहास सांगतो. सिनेमाच्या १०० वर्षांच्या कादकिर्दीत असे अनेक स्टार्स झाले ज्यांनी सिनेसृष्टी अक्षरशः गाजवली. पण आज त्यांच्याबद्दल कोणालाही फारसं आठवत नाही. काही कलाकार अचानक गायब झाले तर काहींनी वेदनादायी आयुष्य जगून जगाचा निरोप घेतात. यापैकीच एक अभिनेत्री प्रिया राजवंश…

तानाजी गलगुंडेला जॅकपॉट, लवकरच दिसणार हिंदी टिव्ही शोमध्ये

सौंदर्यवती आणि उत्तम कलाकार असे दोन्ही गुण या अभिनेत्रीमध्ये होते. प्रियाने फार सिनेमे केले नसले तरी आपल्या मनमोहक अदांनी आणि अभिनय कौशल्यांनी तिने सर्वांनाच आपले चाहते बनवले होते. दिग्दर्शक चेतन आनंद तर तिच्यावर जास्तच भाळले होते.

प्रिया राजवंश यांची सिनेसृष्टीत येण्याची कथाही थोडी नाट्यमयच आहे. २२ वर्षीय प्रिया लंडनमध्ये राहत होती. तेव्हा एका छायाचित्रकाराने तिचे फोटो काढले जे फार व्हायरल झाले. तिचे हे फोटो देव आनंद यांचा भाऊ चेतन आनंद यांनी पाहिले. त्यानंतर चेतन यांनी प्रियाला ‘हकीकत’ या सिनेमासाठी करारबद्ध केले. हळू हळू या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघंही लिव्ह-इनमध्ये राहू लागले. या दोघांचं एकमेकांसाठीचं प्रेम एवढं होतं की प्रियाने फक्त चेतन यांच्याच सिनेमात काम केलं आणि चेतन यांनी त्यांच्या सिनेमात फक्त प्रियालाच अभिनेत्री म्हणून घेतलं.

अनेकवेळा तर चेतन आनंद यांनी प्रियासाठी इतरांशी वादही घातला. इतर दिग्दर्शकांना चेतन यांनी त्यांच्या प्रत्येक सिनेमात प्रियालाच घ्यावे हे मान्य नव्हते. पण चेतन यांना प्रियासमोर दुसरी कोणती अभिनेत्री दिसतच नव्हती. एवढंच काय तर गाइड सिनेमात देव आनंदसोबत वहिदा रेहमानऐवजी प्रिया राजवंश असावी अशी इच्छा होती. पण देव यांनी वहिदा यांच्याच नावाला प्राधान्य दिले.

priya-2

प्रियाला दुसऱ्या सिनेमाचे ऑफर्स मिळत नव्हत्या असे काही नव्हते. पण प्रियाला फक्त चेतन यांच्याच सिनेमात काम करायचे होते आणि त्यांच्यासोबत सतत राहायचे होते. त्यामुळेच ती इतर सिनेमांना नकार द्यायची. दोघांनी जरी कधी लग्न केलं नसलं तरी सिनेसृष्टीत त्यांना पती- पत्नीचाच दर्जा दिला होता. प्रिया राजवंशचे स्वतःचे घरही होते, पण तरीही ती चेतन यांच्यासोबत त्यांच्याच बंगल्यात राहत होती. पण अचानक चेतन यांचे निधन झाले आणि प्रिया एकटी पडली. चेतन यांच्या जाण्यानंतर प्रिया यांची दुर्दशाच व्हायला लागली.

चेतन आनंद ज्या बंगल्यात राहत होते त्याचे भाडे दिवसागणिक वाढत होते, जे प्रियाला फेडता येत नव्हते. शिवाय चेतन यांची दोन मुलं केतन आणि विवेक हे प्रियाला त्या बंगल्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत होते. एक दिवस प्रियाची त्याच बंगल्यात निघृण हत्या करण्यात आली. या हत्येमागे चेतन आनंद यांची दोन मुलं आणि एक मोलकरीण यांची नावे समोर आली.

एका नवीन शोसाठीचा मिथूनचा हा लूक पाहिला का?

२००२ मध्ये या तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अशाप्रकारे एका नावाजलेल्या अभिनेत्रीचा अगदी करुण अंत झाला. प्रियाने जरी या जगाचा निरोप घेतला असला तरी आजही तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे लोक दिवाने आहेत. प्रियाने ‘हीर रांझा’, ‘कुदरत’, ‘हकीकत’ आणि ‘हिंदुस्तान की कसम’ हे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात.

Story img Loader