दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रियामनी ही प्रियकर मुस्तफा राज याच्याशी बुधवारी विवाहबद्ध झाली. बेंगळुरू येथे हा विवाह सोहळा पार पडला. कोर्ट मॅरेज केल्यानंतर या जोडप्याने जवळच्या मित्र-परिवारासाठी शानदार रिसेप्शनचे आयोजन केलेले. प्रियामनीने अनेक तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी सिनेमांत काम केले आहे. २००७ मध्ये ‘परुथीवीरन’ या तामिळ सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
प्रियामनी – मुस्तफाच्या संगीत सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियामनीचा जवळचा मित्र पारुल यादवनेही संगीत सोहळ्याचे काही फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, ‘प्रियामनी आणि मुस्तफाच्या संगीत पार्टीमध्ये फार धम्माल आली…’

https://twitter.com/priyamani6/status/736766434915667968

प्रियामनीने गेल्याच वर्षी ती लग्न करणार असल्याचे सांगितले होते. मुस्तफाचा आणि तिचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत म्हटले की, ‘मला सांगायला फार आनंद होत आहे की, निकटवर्तीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत आमचा साखरपुडा झाला.’ आपल्या लग्नाबद्दल ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियामनीने सांगितले की, ‘आमचे धर्म वेगळे असल्यामुळे आम्ही कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. पारंपारिक प्रथांनी लग्न करण्यापेक्षा कोर्ट मॅरेज करणं आम्हा दोघांनाही पटलं आणि आमच्यासाठी तेच योग्य होतं.’

लग्न झाले असले तरी प्रियामनी लगेच कामाला सुरूवात करणार आहे. ‘लग्नाच्या दोन दिवसांनंतर लगेच मी कामाला सुरूवात करणार आहे. मी आता ब्रेक घेणार नाहीये कारण माझ्या दोन सिनेमाचे चित्रीकरण बाकी आहे.’, असेही तिने म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियामनीचा नवरा मुस्तफा राज हा मुंबईस्थित उद्योजक आहे. तो सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा कर्ताधर्ता आहे. सीसीएलशिवाय देशभरात त्याचे अनेक व्यवसाय आहेत.