बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच त्यांच्या अभिनयासोबतच लक्झरी लाइफस्टाइल आणि फॅशनसेन्समुळे चर्चेत असतात. यात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या महागड्या वस्तू आणि कपड्यांसाठी खासकरुन ओळखले जातात. अभिनेत्री प्रियांका चोप्रादेखील तिच्या पर्स किंवा डिझायनर कपडयांमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर प्रियांकाच्या एका कोटची चर्चा रंगली आहे. साधा वाटणारा तिचा हा कोट चांगलचा महाग असल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या सगळीकडे ख्रिसमसचा उत्साह आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण ख्रिसमस सेलिब्रेट करत आहे. यात प्रियांकादेखील पती निक आणि जोनास कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये सेलिब्रेशन करत आहे. याचे काही फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोमध्ये प्रियांकाने ऑफ व्हाईट रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. हे जॅकेट दिसताना अत्यंत साधं वाटत असलं तरीदेखील त्याची किंमत ही थक्क करणारी आहे.
View this post on Instagram
प्रियांकाने मॅकेज या ब्रॅण्डचं जॅकेट परिधान केलं असून त्याची किंमत ९५० डॉलर्स म्हणजे ६९,८८६ रुपये इतकी आहे. जवळपास ७० हजार रुपयांचं हे जॅकेट सध्या सोशल मीडियावर चर्चिलं जात आहे.
दरम्यान, प्रियांका गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने देशातील शेतकरी आंदोलनावर मत व्यक्त केलं होतं. मात्र, तिला ट्रोल व्हावं लागलं. प्रियांका सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती ‘द व्हाइट टायगर’ या बॉलिवूड तर, ‘टेक्सस फ्रॉम यू इन लंडन’ या हॉलिवूडपटात झळकणार आहे.