तिचं नाव प्रियांका चोप्रा आहे, ब्रियांका चोप्रा किंवा प्रियांका शोप्रा नाही. अमेरिकी नेहमीच या नावात गल्लत करतात म्हणून आम्ही तिचं नाव पुन्हा एकदा स्पष्ट लिहूनच दाखवलं आहे. ‘वोग’ मासिकाने ‘बेवॉच’ स्टारला ७३ प्रश्न विचारले आणि तिची उत्तर पाहून सगळेच पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले. पण तुम्हाला माहिती आहे का, जगभरात तिने कुठेही प्रवास केला तरी ती तिच्यासोबत छोट्या मंदिराची प्रतिकृती घेऊन जाते. जगभरात फिरताना तिकडचं जेवण दरवेळी आवडेलच असं नाही म्हणून तिच्या बॅगमध्ये हॉट सॉसची बाटलीही नेहमीच असते. आता भारतीय म्हटल्यावर तिखट खाण्याची सवय थोडीच जाणार आहे.

प्रभासमुळे अनुष्का शेट्टीचे आतापर्यंत लग्न झाले नाही!

तसंच अमेरिकेतील लोकांना भारताबद्दल जे काही गैरसमज आहेत त्याबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली की, ‘तिथे सगळ्यांना आम्ही ‘भारतीय भाषा’ बोलतो असं वाटतं. हे म्हणजे असं झालं की अमेरिकेत ‘अमेरिकन भाषा’ बोलतात. तसेच भारतात सगळे अरेंज मॅरेज करतात असाही अमेरिकन लोकांचा समज आहे जो पूर्णपणे चुकीचा आहे,’ असं ती ठामपणे सांगते.

पण तिच्या या प्रश्नोत्तरांमध्ये हृदयस्पर्शी असं तिचं एक उत्तर होतं ते म्हणजे तिला घरची फार आठवण येते. पण काही क्षणांतच ती स्वतःला सावरते. या व्हिडिओमध्ये ती तिच्या संपूर्ण घरात फिरताना दिसते. यात तिच्या घराचं इंटेरिअर पाहून तिचे चाहते नक्कीच खूश होतील यात काही शंका नाही.

या प्रश्नोत्तरामध्ये ती ‘क्वांटिको’मधील काही फाईट सीन करताना दिसते. कधी लग्नाची मागणी घालतानाही दिसते. तर कधी ‘बेवॉच’मधील स्लो- मोशन करताना दिसते. तिच्या आयुष्यात तीन ध्येय काय आहेत, असं विचारलं असता, ‘जगभरात जेवढी बेटं आहेत तिथे जायचं आहे, खूप सारी मुलं हवी आहेत आणि तिसरं ध्येय अजून ठरवलं नाही,’ असं गमतीशीर उत्तर तिने दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७३ प्रश्नांच्या या सिरिजमध्ये याआधी टेलर स्विफ्ट, एम्मा स्टोन, डॅनियल रॅडक्लिफ, एमी अॅडम्स आणि ब्लेक लाइव्हली यांचाही समावेश होता.