सध्या प्रियांका चोप्रा जे करते त्यात यशस्वी होते असेच म्हणावे लागेल. बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री झाल्यावर तिने आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. तिथेही तिला यशच मिळाले. सतत नवनव्या गोष्टींमुळे ती चर्चेत असते. या चर्चा तिच्या यशाची गाथाच सांगणाऱ्या असतात हे विशेष. सध्या ती ‘क्वांटिको २’ या मालिकेच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तर ‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या जगातील सर्वात महागड्या टिव्ही अभिनेत्रींच्या यादीमध्ये आपल्या पिगीच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे.
‘फोर्ब्स’कडून जाहीर करण्यात येणाऱ्या जगात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टिव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियांका आठव्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी एबीसीच्या ‘क्वांटिको’मधून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियांकाने या मालिकेतून १.१ कोटी डॉलर एवढी कमाई केली आहे.
प्रियांकाचा सिनेमा ‘बाजीराव मस्तानी’ गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या सिनेमातून तिच्या अभिनयाची अनेक स्थरांतून प्रशंसा करण्यात आली होती. याशिवाय ‘बेवॉच’ या सिनेमातून ती हॉलिवूड सिनेसृष्टीतही पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती ड्वेन जॉनसन या अभिनेत्यासोबत दिसणार आहे.
नुकताच तिचा हॉलिवूडच्या ‘द न्यू रॉयल रिस्ट’मध्ये समावेश करण्यात आला आहे. टाइम मासिकाने हे स्पष्ट केले आहे की, हॉलिवूडची ही रॉयल्टी यादी वंशानुसार न निवडता चांगल्या कामगिरीवर या यादीतील नावे निवडण्यात आली आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2016 रोजी प्रकाशित
जगातल्या महागड्या टिव्ही अभिनेत्रींमध्ये आता प्रियांका चोप्राही
'क्वांटिको'मधून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-09-2016 at 21:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra among forbes 10 highest paid tv actresses