प्रियांका चोप्रा हे नाव लिहिल्यावर सर्वात आधी तिने केलेले कामच डोळ्यांसमोर येते. प्रत्येक दिवशी वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्यांवरुन प्रियांकाच्या यशाच्या गाथा गायल्या जातात. पण कधी कधी आपल्या वक्तव्यांमुळे ती अडचणीतही येते. तिने सिक्कीम राज्याबद्दल असे काही विधान केले की, शेवटी तिला सिक्कीम सरकारची माफी मागावी लागली.

टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रियांका चोप्राने निर्मिती केलेल्या पहुना हा सिनेमा दाखवण्यात आला. या सिनेमाचे महोत्सवात कौतुकही करण्यात आले. या कौतुकानंतर प्रियांकाची मुलाखत घेतली गेली. या मुलाखतीत प्रियांका म्हणाली की, ‘सिक्कीम हे भारताच्या ईशान्य भागातील एक लहानसे राज्य आहे. येथे कधीच सिनेसृष्टी पोहोचली नाही. या राज्यातील कुणीही, कधीही सिनेमाची निर्मिती केली नाही. ‘पहुना’ हा या राज्याशी संबंधित पहिला सिनेमा आहे. कारण सिक्कीममध्ये अनेक अघटित घटना सतत घडत असतात शिवाय सिक्कीम हे गुन्हेगारीने पोळलेले राज्य आहे.’ प्रियांकाचे नेमके हेच विधान लोकांना आवडले नाही. या विधानानंतर सोशल मीडियावर लोकांनी तिला खडेबोल सुनावले. लोकांचा आपल्या वक्तव्याला मिळत असलेला विरोध पाहून तिने माफी मागितली.

‘सिक्कीम हे देशातील सर्वात शांतीप्रिय राज्य आहे. तू केलेल्या वक्तव्याची तुला लाज वाटायला हवी,’ अशा कमेन्ट तिला सोशल मीडियावर येत होत्या. २०१३ मध्ये सर्वात कमी गुन्हेगारी असणारे राज्य म्हणून सिक्कीमचे नाव अग्रणी होते. अशा राज्याबद्दल चुकीचे बोलल्यामुळे अखेर प्रियांकाला सिक्कीम सरकारची माफी मागावी लागली.

Tumhari Sulu Teaser: विद्या बालन म्हणते, ‘हॅलो… मैं सुलु बोल रही हूँ!’

लोकांनी तिच्या या विधानाची तीव्र शब्दांत निंदा केली. एकाने ‘प्रियांका, स्वत:च्या माहितीत भर घाल आणि सिक्कीमच्या लोकांची माफी माग,’असे लिहिले. ‘सिक्कीम एक शांतीप्रिय राज्य आहे आणि कायम शांतीपूर्ण राहिले आहे. सिक्कीम कुठे आहे, हे तरी प्रियांकाला ठाऊक आहे का?,’ असा प्रश्न एका युजरने विचारला होता.