अमेरिकन मालिका ‘क्वांटिको’मध्ये मुख्य भूमिकेपासून, पहिला हॉलिवूड चित्रपट ‘बेवॉच’मध्ये केलेले काम आणि अनेक जागतिक कार्यक्रमांच्या रेड कार्पेटवर झळकण्यापर्यंत प्रियांका चोपराने जगभरात नाव कमावलं आहे. अभिनय क्षेत्रात प्रभावीपणे आपली एक स्वतंत्र आणि वेगळीच ओळख प्रियांकाने निर्माण केली आहे.

जगभरातील अत्यंत प्रसिद्ध अशा ख्रिस्ती ब्रिंकले, अॅलेक वेक, विझ खलिफा यांच्यासोबत एडवर्ड इनिनफुल दिग्दर्शित ‘गॅप’च्या जाहिरात मोहिमेत प्रियांकासुद्धा झळकली आहे. ‘ब्रिजिंग द गॅप’ या शिर्षकाखाली कपड्यांच्या ब्रँडची ही जाहिरात मोहीम आहे. एकमेकांमधील सर्व बंधने, अंतर आणि भेदभाव दूर करून एकत्र येण्याचा संदेश या जाहिरातीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रभावी अभिनेत्रीसोबतच प्रियांकाने एक जबाबदार व्यक्तिमत्त्व असल्याचंही सिद्ध केलं आहे.

वाचा : ‘बाहुबली’मागोमाग ‘या’ चित्रपटाच्या ट्रेलरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

या जाहिरात मोहिमेतील संदेश आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा व्हिडिओ प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘जगातील अनेक भेदभाव मिटवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र आलो तर चांगले भविष्य आपण निर्माण करू शकतो’ असा संदेशदेखील प्रियांकाने या व्हिडिओसोबत दिला आहे