जगातील सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींची यादी ‘फोर्ब्स’ने मंगळवारी जाहीर केली. १ जून २०१६ ते १ जून २०१७ दरम्यान टिव्ही अभिनेत्रींनी कमवलेल्या उत्पन्नानुसार ही यादी जाहीर करण्यात आलीय. ‘मॉडर्न फॅमिली’ फेम अभिनेत्री सोफिया व्हर्जराने सलग सहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहण्यात यश मिळवलेय. तिची वार्षिक मिळकत २७१ कोटी रुपये इतकी आहे. तर प्रियांका चोप्रा या यादीत आठव्या स्थानी असून, तिचे उत्पन्न ६५ कोटी रुपये आहे.

वाचा : जगातील सर्वात महागड्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

प्रियांकाने पहिल्यांदाच ‘क्वांटिको’ (२०१६) या अमेरिकन मालिकेच्या बळावर ‘फोर्ब्स’च्या यादीत स्थान मिळवलेय. २०१७ मध्ये ती ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनसोबतच ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटात दिसली. या चित्रपटात तिच्यासोबत ड्वेन जॉन्सन म्हणजेच रॉकने काम केले होते. २०१६ मध्ये प्रियांकाने ११ मिलियन डॉलर इतकी कमाई केलेली. याशिवाय, ती काही उत्पादनांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडरदेखील आहे. उत्पन्नात सातत्य राखणारी अभिनेत्री म्हणून ‘फोर्ब्स’ने या भारतीय अभिनेत्रीचा उल्लेख केला आहे.

यशाच्या शिखरावर असलेली व्हर्जरा केवळ तिच्या शोमधूनच ४१.५ मिलियन डॉलरची कमाई करते. याव्यतिरिक्त हेड अॅण्ड शोल्डर, पेप्सीच्या जाहिराती आणि अनेक मासिकांच्या मुखपृष्ठासाठी केलेल्या मॉडेलिंगमधून तिला उत्त्पन्न मिळते. तिने २०१५मध्ये २८ मिलियन डॉलर तर २०१६मध्ये ४३ मिलियन डॉलर इतकी कमाई केली होती.

वाचा : दिव्या भारतीच्या बहिणीचे हे फोटो पाहिलेत का?

या यादीत कॅली कुआको ही दुसऱ्या स्थानावर असून तिचे उत्पन्न २६ मिलियन डॉलर (१७० कोटी रुपये) इतके आहे. एलेन पॉम्पिओ, मिन्डी कलिंग, मरिस्का, जुली बोवेन आणि केरी वॉशिंग्टन यांच्या नावांचाही ‘फोर्ब्स’ यादीत समावेश आहे.