आज जागतिक पातळीवर आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या प्रियांका चोप्राने २००२ मध्ये ‘थामिजान’ या तमिळ सिनेमातून आपल्या सिनेकरिअरला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये तिचे पदार्पण सनी देओल आणि प्रिती झिंटाचा ‘द हिरो’ या सिनेमातून झाले. यानंतर २००३ मध्ये आलेला ‘अंदाज’ आणि २००४ मध्ये आलेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या सिनेमात तिच्या मुख्य भूमिका होत्या.
कपिल शर्माची अशीही सामाजिक कामगिरी
२००८ मध्ये आलेल्या ‘फॅशन’ सिनेमातील अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या सिनेमानंतर प्रियांकाने ‘कमीने’, ‘७ खून माफ’, ‘बर्फी’, ‘मेरी कॉम’, ‘दिल धडकने दो’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ असे एकाहून एक हिट सिनेमे केले. प्रियांकाने प्रकाश झा दिग्दर्शित ‘जय गंगाजल’ या सिनेमात काम केले. या सिनेमानंतर तिचा आतापर्यंत एकही सिनेमा बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेला नाही. पण सध्या ती तिचं सारं लक्ष सिनेनिर्मितीमध्ये देत आहे.
‘व्हेंटिलेटर’ आणि ‘काय रे रास्कला’ हे तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे दोन मराठी सिनेमे आहेत. २०१५ मध्ये तिच्या हॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. ‘क्वांटिको’ या अमेरिकन टिव्ही सिरीजमध्ये तिने एफबीआय एजंट अॅलेन पेरिशची व्यक्तिरेखा साकारली होती. या शोमधील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना एवढी आवडली की तिला दुसऱ्या सिझनमध्येही सहभागी करुन घेण्यात आले. या मालिकेनंतर तिने ड्वेन जॉन्सनसोबतचा ‘बेवॉच’ हा सिनेमाही केला. या सिनेमात तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. या सिनेमात तिच्या व्यक्तिरेखेचे नाव व्हिक्टोरिया लीड्स होते.
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर हवा तसा गल्ला जमवला नसला तरी प्रियांकाच्या भूमिकेचे जगभर कौतुक करण्यात आले होते. प्रियांकाने हिंदीशिवाय अन्य भाषेतील सिनेमांमध्येही काम केले आहे. ‘बम बम बोल रहा है काशी’ या भोजपुरी सिनेमात तर ‘जंजीर’ या बंगाली सिनेमाचाही ती महत्त्वपूर्ण हिस्सा होती.
देश- विदेशात सध्या प्रियांकाच्याच नावाचा दबदबा पाहायला मिळत आहे. प्रियांका चोप्राने आतापर्यंत केलेल्या सिनेमांच्या यादीवर एक नजर टाकूया. बॉलिवूडची ही हरहुन्नरी अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेम कथेवर आधारित सिनेमाच्या प्रॉडक्शनवर काम सुरु करत आहे.
थामिजान- २००२
द हिरो- २००३
अंदाज- २००३
प्लॅन- २००४
किस्मत- २००४
असंभव- २००४
मुझसे शादी करोगी- २००४
ऐतराज- २००४
ब्लॅकमेल- २००५
करम- २००५
वक्त- २००५
यकीन- २००५
बरसात- २००५
ब्लफमास्टर- २००५
टॅक्सी नंबर ९२११- २००६
३६ चायना टाऊन- २००६
अलग- २००६
क्रीश- २००६
आप की खातीर- २००६
डॉन- २००६
सलाम- ए- इश्क- बिग बदर- २००७
माय नेम इज अॅन्थनी गोनसाल्वीस- २००८
लव्ह स्टोरी २०५०- २००८
गॉड तुसी ग्रेट हो- २००८
चमकू- २००८
द्रोणा- २००८
फॅशन- २००८
दोस्ताना- २००८
बिल्लू- २००९
कमिने- २००९
व्हॉट्स युवर राशी?- २००९
प्यार इमपॉसिबल- २०१०
जाने कहा सें आयी है- २०१०
अंजाना अंजानी- २०१०
७ खून माफ- २०११
रा.वन- २०११
डॉन २- २०११
अग्निपथ- २०१२
तेरी मेरी कहानी- २०१२
बर्फी- २०१२
दिवाना मैं दिवाना- २०१३
गर्ल रायझिंग- २०१३
शुटआऊट अॅट वडाळा- २०१३
बॉम्बे टॉकिज्- २०१३
प्लेन्स- २०१३
झंजीर- २०१३
क्रीश ३- २०१३
गोलींयो की रासलीला रामलीला- २०१३
गुंडे- २०१४
मेरी कोम- २०१४
दिल धडकने दो- २०१५
बाजीराव मस्तानी- २०१५
जय गंगाजल- २०१६
बम बम बोल रहा है काशी- २०१६
व्हेंटिलेटर- २०१६
सारवन- २०१७
बेवॉच- २०१७