बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अदांचा जलवा दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात परतल्यापासूनच अनेकांना ‘फॅशन गोल्स’ देत आहे. अगदी पारंपरिक पोशाखापासून पाश्चिमात्य कपड्यांमध्ये प्रियांका या दिवसांमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसली. प्रियांकाच्या स्टायलिश लूकवरून आता अनेकांना नजर हटवणेही कठीण झाले असेल. नुकतीच ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. ‘पेंग्विन रॅण्डम हाऊस’च्या एका कार्यक्रमामध्ये प्रियांका ‘पिंक गर्ल’ बनून गेली होती.

वाचा : रेप सीनसाठी माधुरीवर टाकण्यात आलेला दबाव

प्रियांकाच्या या सुंदर लूकमध्ये अमी पटेलचा हात आहे. तिने सर्जिओ हुडसन्स फुशिया वूल क्रेप जम्पसूट घातला होता. या जम्पसूटवर सोनेरी रंगाची बटणं लावण्यात आलेली होती. यावर तिने त्याच रंगाचा व्हेलवेट कॉलर असलेला मोठा कोट घातला होता. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने पांढऱ्या रंगाच्या हिल्स घालण्यास प्राधान्य दिले.

वाचा : सोनाक्षी सिन्हावर रत्ना पाठक शहा यांची सडकून टीका

प्रत्येक अभिनेत्रीसाठी मेकअप ही नेहमीच महत्त्वाची बाब असते. त्यामुळे प्रियांकाने याची जबाबदारी पूर्णपणे तिच्या मेकअप टीमकडे सोपवली होती. स्मोकी आइज, फुशिया लिप्स तिच्या ड्रेसला साजेसे असेच होते. तिच्या या ड्रेसची किंमत तब्बल दोन लाख रुपये असल्याचे कळते.