बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयकौशल्याने आणि सौंदर्याने वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिच्या लूकवरून नेटीझन्सकडून टीका होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर तोकडे कपडे घालून गेल्याच्या कारणावरून तिच्यावर टीकेची झोड उठली होती. प्रियांकाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे आणि त्यावरूनच तिच्यावर नेटीझन्सकडून पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे.

प्रियांकाचा हा सेल्फी पाहून तिने ओठांची सर्जरी केली का, असा अंदाज चाहत्यांनी लावला आणि टीकांचा भडीमार सुरू केला. फोटो शेअर करताच तिच्या ओठांबद्दल लोकांनी बोलायला सुरुवात केली. ‘तुझ्यासारख्या सेलिब्रिटीपेक्षा सामान्य मुलीसुद्धा खूप सुंदर दिसतात,’ अशा कमेंट्सदेखील तिच्या फोटोवर येऊ लागल्या.

वाचा : शाहरूखकडून सलमानला महागडी कार गिफ्ट

याआधीसुद्धा तिने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला होता तेव्हा देखील तिच्या नाकावरून नेटीझन्सकडून टीका करण्यात आली. प्रियांकाने जवळून तो फोटो काढल्याने त्यामधील तिचे नाक पाहून सर्जरी केल्याचा संशय अनेकांना आला. ‘तुझं नाक अत्यंत विचित्र दिसत असून तू सर्जरी केलीस का ?’ असा सवालही टीकाकारांनी केला होता. ‘बेवॉच’ गर्ल प्रियांका नेहमीच टीकांना सडेतोड उत्तर देताना दिसते. कपड्यांवरून झालेल्या टीकांनंतर तिने दिलेल्या टीकाकारांचे तोंड बंद झाले होते. त्यामुळे आता प्रियांका आता काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader