भारतासह परदेशातही आपल्या अभिनयाची भुरळ घालणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या यशाच्या शिखरावर आहे. क्वाँटिको या परदेशी मालिकेसाठी पिपल्स चॉइस पुरस्कार पटकाविणारी अभिनेत्री ख-या आयुष्यातही तितकीच खमकी आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रियांकाने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली की, माझ्या आयुष्यात पुरुषाची गरज केवळ मुलांना जन्म देण्यासाठी आहे. मला हिरे आवडतात, परंतु त्यासाठी मला साथीदाराची गरज नाही. मी स्वतः एकटी जाऊन हि-यांची खरेदी करते. मुलाखतीत तिला तिच्या बोटातील अंगठीबाबत विचारणा केली असता ती म्हणाली, ‘माझे हिरे मी स्वत: खरेदी करते. माझ्या आयुष्यात पुरुष आलाच तर तो मला हिरे विकत घेऊन देण्यासाठी नसेल. माझ्या आयुष्यात येणारा पुरुष मला हिरे विकत घेऊन देण्यासाठी नाही तर मुलांना जन्म देण्यासाठी असेल.
प्रियांकाला सिंगल स्टेटस बद्दल विचारले असता तिने मी नक्की लग्न करेन परंतु, विवाहबाह्य संबंधातून मुलाला जन्म देणं मला पसंद नाही आणि आपला समाजतही अशीच विचारधारणा आहे, या शब्दांत प्रसारमाध्यमांना उत्तर दिले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2016 रोजी प्रकाशित
पुरुषांची गरज केवळ मुलांना जन्म देण्यासाठी- प्रियांका चोप्रा
माझ्या आयुष्यात येणारा पुरुष मुलांना जन्म देण्यासाठी असेल.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 29-01-2016 at 13:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra says she doesnt need a man for anything